Month: October 2025

महानगर

वसई दिवा या मार्गावर लोकल वाहतूकीसाठी प्रयत्न

मुंबई, दि. २६ : वसई दिवा या मार्गावर आजमितीला लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. याच मार्गावर विरार वसई ते कर्जत कसारा आणि बोरीवली कर्जत कसारा लोकल वाहतूक सुरु करण्याची मागणी आपण निश्चितपणे रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांच्या कडे तातडीने करणार आहोत, असे निःसंदिग्ध आश्वासन बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी आज दिले. १९७८ साली भिवंडी चे आमदार […]Read More

राजकीय

लासलगावचा कचरा डेपोचा प्रश्न सुटणार ; लवकरच होणार शिवनदी संवर्धनाच्या

नाशिक दि.२६ :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव शिवनदी संवर्धन करण्यासाठी ११.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन शिवनदी संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार असून लासलगाव कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती […]Read More

महानगर

अखेर वाहतूक विभागाचे पोलिस शिपाई किरण सूर्यवंशी यांचा विविध मान्यवरांनी

मुंबई, दि २६ब्रेकअप झाल्यानंतर काळाचौकी येथे भरदिवसा तरुणीवर तिचा प्रियकर चाकूने वार करीत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र जवळच कर्तव्यावर असणारे वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी हे तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी तिला आरोपीच्या ताब्यातून कसेबसे सोडवले. रक्ताच्या थारोळ्यातून उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला.सोनू बराय या […]Read More

क्रीडा

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”

ठाणे, दि. २६ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली “प्रोजेक्ट महादेवा” ही योजना महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे – जिल्हास्तरावरील निवड चाचण्या, प्रादेशिक फेरी आणि अंतिम निवड फेरी. अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सीआयडीसीओ ग्राऊंड, खारघर […]Read More

महानगर

‘ सुजाता मडके ‘ या शहापूरच्या कन्येची “इस्रो”मध्ये थरारक झेप

ठाणे दि २६ : “यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव (जि. ठाणे) येथील सुजाता रामचंद्र मडके हिचे अभिनंदन केले आहे. […]Read More

मराठवाडा

आता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले

छ संभाजीनगर दि २६ : दक्षिण मध्य रेल्वे“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील “औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे करण्यास मान्यता दिली आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड “CPSN असा असेल. त्यामुळे “औरंगाबाद रेल्वे स्थानकास आता पुढे […]Read More

महानगर

भारत डायमंड बोर्सचा स्थापना दिन साजरा

मुंबई दि २६ : भारत डायमंड बोर्सने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे त्यांचा ४१ वा स्थापना दिन आणि १५ वर्षे यशस्वी कामकाज साजरे केला. या प्रसंगी जागतिक हिरे व्यापारात इंडिया डायमंड बोर्सच्या योगदानाचे प्रतीक असलेले एक स्मारक टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आले. भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनूप मेहता यांनी स्वागत भाषण केले . प्रमुख पाहुणे संस्कृति […]Read More

विदर्भ

गोंदियात परतीच्या पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान

गोंदिया दि २६ -:- गोंदिया जिल्यात परतीच्या पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत देण्याची मागणी केली आहे. गोंदिया जिल्यात या वर्षी तब्बल १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात धान पिकांची लागवड […]Read More

विदर्भ

भंडारा जिल्ह्यात धान पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत….

भंडारा दि २६ :- भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसाने धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो . जिल्ह्यातील शेतकरी धान पीक घेत असतात. आता ऑक्टोबर महिन्यात धान कापणीला आले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीवर धान पीक कापणी करून ठेवली, नंतर मळणी करून धान घरी नेणार होते. […]Read More

राजकीय

राज्यात ५०० वाळू साठे! , तुटवडा १५ दिवसांत कमी होणार

नागपूर, दि. २५: महसूल विभागाने राज्यातील ५०० पैकी साडेतीनशे वाळू घाटांच्या लिलावाची तयारी केली असून, सद्या राज्यात निर्माण झालेला वाळू तुटवडा १५ दिवसांत कमी होईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मंत्री बावनकुळे म्हणाले, की दरवर्षी ३० जून ते ३० सप्टेंबर या काळात राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार वाळू उत्खनन बंद ठेवावे लागते. त्यामुळे सध्या तात्पुरता […]Read More