Month: September 2025

ट्रेण्डिंग

राज्यातील पहिला क्रिप्टो करन्सी अन्वेषण कक्ष

ठाणे, दि. २५ : महाराष्ट्रात आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ठाणे शहरात राज्यातील पहिल्या क्रिप्टोकरन्सी तपास युनिटची स्थापना करण्यात आली आहे. डिजिटल चलनाच्या वाढत्या वापरामुळे आणि त्याचा गैरवापर होण्याच्या शक्यतेमुळे हे युनिट अत्यंत आवश्यक ठरत होते. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूक, मनी लॉन्डरिंग, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय […]Read More

ट्रेण्डिंग

पाकीस्तानमधील विद्यार्थी शिकणार भारतासोबतच्या युद्धाचा धडा

पाकिस्तानमधील काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना भारतासोबतच्या ऐतिहासिक संघर्षाचा अभ्यासक्रम शिकवला जात असल्याचे समोर आले आहे. विशेषतः इस्लामाबादमधील काही उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारत-पाकिस्तान युद्ध, राजकीय मतभेद आणि लष्करी संघर्ष यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना केला जातो. या अभ्यासक्रमाचा उद्देश इतिहास समजून घेणे असला तरी, काही विद्यार्थ्यांच्या मते यामध्ये भारताविरुद्ध नकारात्मक भावना पसरवली जाते. विद्यार्थ्यांनी सांगितले की, अशा अभ्यासक्रमांमुळे शेजारी […]Read More

ट्रेण्डिंग

जगातील 2 ऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीने 95% संपत्ती केली दान

ओरेकल कंपनीचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 373 अब्ज डॉलर्स इतकी असून, त्यांनी 2010 मध्ये ‘Giving Pledge’ या मोहिमेअंतर्गत त्यांच्या संपत्तीपैकी 95% दान करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा केवळ शब्दांपुरती मर्यादित न राहता, त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून ती सिद्ध केली आहे. एलिसन यांनी परोपकारासाठी […]Read More

राजकीय

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा

मुंबई, दि. २५ : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या सहा महिन्यांत विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आयोगाने टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ व स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मतपत्रिका / इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील टपाल मतपत्रिका यांची मोजणी आणि ईव्हीएमद्वारे मोजणी ह्या आयोगाच्या मतमोजणी प्रक्रियेतील दोन प्रमुख टप्पे […]Read More

महानगर

पॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा

मुंबई, दि. २५ : वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉड टॅक्सी संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांना सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई […]Read More

राजकीय

प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

मुंबई, दि. २५ : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय घेणाऱ्या […]Read More

महानगर

कॉटन ग्रीन स्टेशनबाहेर पसरले कचऱ्याचे साम्राज्य, प्रवासी हैराण

मुंबई, दि २५हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु रेल्वे स्थानकावर चढताना फलाट क्रमांक एक च्या बाहेर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.या परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याने रेल्वे प्रवाशी हैराण झाले असून हा कचरा त्वरित उचलावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत. कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन हे […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे क्रीडामंत्री कोकाटेंचे आवाहन

नाशिक, दि. २५: राज्यात अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून या संकटकाळात बळीराजाला मदतीचा हात देण्याचा निर्णय शेतकरीपुत्र आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे. आपल्या अधिकृत सोशल पेजच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केले आहे. मराठवाड्यासह अनेक ठिकाणी सामान्य नागरिक, शेतकरी यांच्या शेतीसह घरांची आणि […]Read More

मराठवाडा

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, पंचनाम्यांची नाही..

धाराशिव दि २५ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यात इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा आणि मागण्या जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या घामाने उभं केलेलं पीक मातीमोल झालंय, घराचं छप्पर पुराच्या […]Read More

पर्यटन

एसटीच्या मोबाईल ॲपला प्रतिसाद वाढला, १० लाख वापरकर्ते

मुंबई दि २५ — राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, एस.टी. महामंडळाने मोबाईल ॲप काही महिन्यांपूर्वी सुधारणा करुन नवीन आवृत्ती (व्हर्जन) मध्ये सुरू केले […]Read More