Month: September 2025

देश विदेश

लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक

लेह, दि. २६ : लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला असून ९० हून अधिक जखमी झाले आहेत. सोनम वांगचुक हे गेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

महिला रोजगार योजना, ७५ लाख महिलांच्या खात्यावर १० हजार रुपये

पटना, दि. २६ : बिहारच्या निवडणूका जवळ आल्याने सत्ताधारी पक्षाकडून आता विविध योजनांची घोषणा करण्यात येत आहे. बिहार सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ अंतर्गत राज्यातील ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात थेट १० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेली ही योजना […]Read More

महाराष्ट्र

पूर परिस्थितीमुळे MPSC परीक्षेची तारीख बदलली

मुंबई, दि. २६ : राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ही परीक्षा येत्या रविवारी 28 सप्टेंबर 2025 ला होणार होती. पण आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 ला होणार असल्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीपत्रक काढून सांगण्यात आलं […]Read More

बिझनेस

परदेशी औषधांवर अमेरिका लावणार १००% टॅरिफ

मुंबई, दि. २६ : अमेरिकेने परदेशी औषधांवर १००% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक औषध उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांच्या औषध निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या ट्रेड प्रतिनिधींनी हा प्रस्ताव सादर केला असून त्याचा उद्देश देशांतर्गत औषध उत्पादकांना संरक्षण देणे आणि आयातावर नियंत्रण ठेवणे असा आहे. या घोषणेमुळे […]Read More

अर्थ

ATM मधुन काढता येणार PF चे पैसे

मुंबई, दि. २६ : आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) मधील रक्कम थेट ATM मधून काढता येणार आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने दिली आहे. ही सुविधा जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ईपीएफओचे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) लवकरच होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. […]Read More

देश विदेश

देशात ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

मुंबई, दि. २६ — भारतात ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून विशेषतः ४० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये ही समस्या गंभीर होत चालली आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे. ‘न्यूरोवासकॉन २०२५’ या राष्ट्रीय न्यूरोलॉजी परिषदेत बोलताना वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. भावना दिओरा यांनी स्ट्रोक ही एक प्रतिबंधक आणि उपचारक्षम स्थिती असल्याचे अधोरेखित केले. डॉ. दिओरा म्हणाल्या, […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, पूरग्रस्तांसाठी मागितली मदत

नवी दिल्ली दि २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण […]Read More

महानगर

ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी विवेक गायकवाड, तर सचिवपदी

मुंबई, दि. २६ : विक्रोळी कन्नमवार नगर येथील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळ (रजि.) यांच्या २०२५ ते २०२८ त्रैवार्षिक कार्यकारिणी निवडणूकीत अध्यक्षपदी विवेक विठोबा गायकवाड तर सचिवपदी, समाजभूषण ज्येष्ठ पत्रकार नासिकेत कृष्णकांत पानसरे यांची निवड झाली आहे. दिपक देशनेहरे आणि विनोद वणीकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.उपाध्यक्ष : निवृत्ती शिदू मस्केउपसचिव :श्रद्धानंद रावबा निकम,खजिनदार […]Read More

महानगर

हंसचा दिवाळी अंक लक्षाधीश झाला!

पनवेल, दि २६: मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, देशातील सर्वाधिक बक्षिस रकमेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत यंदा पहिल्या क्रमांकाचा लक्षाधीश होण्याचा मान अभिराम आनंद अंतरकर संपादित ‘हंस’ दिवाळी अंकाने पटकावला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे गुरुवारी […]Read More

विदर्भ

विदर्भाच्या विकासाला वेग देणारी ‘अमृत भारत एक्सप्रेस’!

नागपूर दि २६ : वर्ध्यातील प्रवाशांसाठी ओडिसा, छत्तीसगड आणि गुजरात दरम्यान आरामदायी, वेळेची बचत करणारी आणि सर्वांना परवडणारी साप्ताहिक लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. या गाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 27 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. वर्धा व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ही महत्त्वाची भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान […]Read More