Month: September 2025

मराठवाडा

जायकवाडी धरणातून विसर्ग; गोदाकाठच्या गावांत पाणी

छ. संभाजीनगर दि २८ – पैठणच्या जायकवाडी धरणातून आज सकाळपासून तब्बल सव्वा दोन लाख क्युसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नवगाव, आपेगाव, मायगाव, वडवाळी, हिराडपुरी, नायगाव आणि उंचेगाव या गावांमध्ये पाणी शिरले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे. धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून, जोरदार वेगाने पाणी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव…

सातारा दि २८ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगड येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ललित पंचमीच्या दिवशी रात्री श्री भवानी मातेच्या मंदिरास साडेतीन वर्षे पूर्ण झाले त्या निमित्ताने मशाल महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी प्रतापगडावरती सुमारे 366 मशाली शिवप्रेमींनी पेटवल्या. शक्ती आणि युक्तीचा संदेश देत युवकांनी छत्रपती शिवाजी […]Read More

महानगर

अशोक सराफ यांच्या सन्मानासाठी उलवे नगरी सज्ज

पनवेल, दि २८,मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, ‘पद्मश्री’ आणि भूषण’ ‘महाराष्ट्र पुरस्कारप्राप्त, अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा सपत्निक भव्य नागरी सत्कार रविवारी २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता उलवे नोडमधील ‘भूमिपुत्र भवन’ येथे मान्यवरांच्या साक्षीने होणार आहे. रायगड, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने हा नागरी सत्कार होणार आहे. हा सत्कार समारंभ शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे […]Read More

कोकण

जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘”रिव्हर राफ्टींग”‘ सुरू….

महाड दि २८ – रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात जागतिक पर्यटन दिनानिमित्त रानबाजिरे येथील धरणालगतच्या पुलालगत नरवीर ऍडव्हेंचर्स ऍण्ड स्पोर्टस रिव्हर राफ्टींगच्या या साहसी खेळाचा शुभारंभ विकास गोगावले यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. “पोलादपूरच्या दरी डोंगराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला निसर्ग संपन्नतेची जोड असून या दूर्गम डोंगराळ तालुक्यात पर्यटन […]Read More

खान्देश

नाशिकमध्ये जोरदार पाऊस,रामकुंड परिसर पाण्याखाली…

नाशिक दि २८ : जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर यांसारख्या अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली […]Read More

मराठवाडा

परभणीत रेड अलर्ट, मुसळधार पाऊस सुरू

परभणी दि २८ : जिल्ह्यात रेड अलर्ट झोन असल्याने मुसळधार पाऊस सुरू आहे,त्यामुळे परभणी शहरासह अनेक भागात पाणीसाचले आहे, पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील घरांची पडझड झाली असून संसार उपयोगी साहित्य आणि अन्नधान्याची नुकसान झाले . येलदरी धरणातून पुर्णा नदीपात्रात १०क्युसेक्स क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीत २१ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग […]Read More

मराठवाडा

आष्टी तालुक्यातील पुंडी गावातील मंदिर, शाळा पाण्यात

बीड दि २८….आष्टी तालुक्यातील पुंडी गावातून मेहकरी नदीला पूर आला असल्याने नदीचे पाणी पुंडी गावात शिरले आहे. सर्व मंदिरे,शाळा या पुराच्या पाण्यात गेल्या असून या पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे व जनावरांनसाठी बनवलेल्या मुरघासाचे प्रचंड नुकसान झाले आहे, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी सरपंच प्रतिभाताई थोरवे यांनी केली आहे.ML/ML/MSRead More

देश विदेश

पंतप्रधानांच्या हस्ते BSNL च्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

पुणे, दि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या 92 हजार 633 टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी 9 हजार 30 टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत 4जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र […]Read More

ऍग्रो

तुळजाभवानीच्या मंदिराकडून पूरग्रस्तांना एक कोटींची मदत

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. शेतातील पीक वाहून गेले, जनावरांचे हाल झाले, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आणि असंख्य कुटुंबे बेघर झाली. अशा संकटाच्या काळात श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराने हात पुढे करून हजारो पूरग्रस्तांच्या डोळ्यात दिलासा आणला आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

रायगड, पुणे घाट परिसरासाठी उद्या रेड अलर्ट जारी

मुंबई, दि. २७:- रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात उद्या( २८ सप्टेंबर ) रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ‘सचेत’च्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना देण्यात […]Read More