Month: September 2025

महिला

ही बँक लाडक्या बहिणींना देणार 0% व्याजदराने कर्ज

मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मुंबई बँक आणखी एक गिफ्ट देणार आहे. या लाडक्या बहीणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे. या कर्ज वितरणाचा उद्घाटन सोहळा बुधवारी 3 सप्टेंबरला होणार आहे. विधान परिषदेतले भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या हस्ते हे उद्घाटन […]Read More

अर्थ

ऑगस्टमध्ये GST तून विक्रमी महसूल संकलन

मुंबई : ऑगस्ट २०२५ मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून सरकारला घसघशीत महसूल मिळाला आहे. सरकारने ऑगस्ट महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये देशातील वस्तू आणि सेवा कर संकलन १.८६ लाख कोटी रुपये राहिले आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ६.५ टक्के जास्त आहे. गेल्या […]Read More

ऍग्रो

उत्सवांमुळे फुलांना मोठी मागणी,आवक घटल्याने दर वधारले….

जालना दि २:– जालना बाजारात सण – उत्सवांमुळे फुलांना मोठी मागणी दिसून येत आहे. पण बाजारात आवक घटल्याने फुलांचे दर वधारल्याचे चित्र दिसून येत आहे. गणेशोत्सवानिमित्त जास्वंद, झेंडू, गुलाब, शेवंती, रजनीगंधा यांसारख्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, सध्या बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने फुलांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला […]Read More

शिक्षण

अकरावीच्या प्रवेशाच्या अंतिम फेरीस मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी सध्या सुरू आहे. या फेरीत प्रवेश घेऊ न शकलेल्या पात्र विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने मंगळवारपर्यंत (दि. २ सप्टेंबर) मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे अजूनही प्रवेश बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी मिळणार आहे. या वर्षी अकरावीचे प्रवेश ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रियेतून होत आहेत. आता ही […]Read More

महानगर

आंदोलन अटी शर्तींचे पालन करूनच, हुल्लडबाजी करणाऱ्यांना बाहेर काढा

मुंबई, दि. १ : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या मराठा आंदोलकांमुळे मुंबई शहरातील व्यवस्थांवर मोठा ताण येत आहे. त्यातच आत्ता गणेशोत्सव सुरु असल्याने मोठ्या जनसमुदायाच्या सुरक्षिततेच्या प्रश्नही निर्माण झाला आहे. सरकारने वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करुन देखील मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. रविवारी मनोज जरांगे यांनी आपण मरेपर्यंत उपोषण करणार […]Read More

देश विदेश

SCO परिषदेत पहलगाम हल्ल्याचा एकमुखाने निषेध

तिआंजिन, चीन, दि. १ : येथे पार पडलेल्या २०२५ च्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत भारताने दहशतवादाविरोधात मोठा राजनैतिक विजय मिळवला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सर्व सदस्य देशांनी एकमुखाने निषेध केला आणि दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची गरज व्यक्त केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे परिषदेत उपस्थित असताना हा […]Read More

सांस्कृतिक

‘वंदे मातरम’ गीत सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात

मुंबई दि १– थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ‘वंदे […]Read More

महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आता ग्रामस्तरावर छाननी समित्या

मुंबई, दि. १ : मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असतानाच सरकार पातळीवर बैठकींचा धडाका सुरू झाला आहे. आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. मराठवाड्यातील जनतेसाठी हैदराबाद गॅझेटबाबत साधारण मसुदा तयार असून अंतिम टप्यात आला आहे अशी माहिती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील […]Read More

महानगर

गणेशोत्सव विसर्जनासाठी महापालिका सज्ज

मुंबई, दि १बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे अनंत चतुर्दशी दिनी अर्थात शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) याठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने विविध स्तरीय व्यवस्था करण्यात येते. याबाबत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना वृत्तसंकलन करणे अधिक सुविधाजनक व्हावे, याकरिता स्वतंत्र मंडप उभारण्यात येतो. या मंडपात प्रवेश करण्यासाठी प्रवेशपत्र बंधनकारक असते. वरीलनुसार आपल्या प्रसारमाध्यम संस्थेच्या प्रतिनिधींना प्रवेशपत्र हवे असल्यास, कृपया […]Read More

राजकीय

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि १गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांची आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य बाहेर मराठी बहुल असणाऱ्या प्रदेशात पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची […]Read More