Month: September 2025

ट्रेण्डिंग

नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई, दि. १०:- नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये व स्थानिक प्रशासनाच्या तसेच भारताच्या दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावाः+977-980 860 […]Read More

महानगर

मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत ६०० मतपत्रिका चोरून लपवून ठेवल्याचा

मुंबई,, दि ९: मतचोर म्हणून राजकारण्यांना बोलले जाते, पण ही व्होटचोरी आता मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत सुरू आहे. संघातील कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी संगनमत करून ६०० सदस्यांच्या मत पत्रिका चोरून लपवून ठेवल्या आहेत. योग्य वेळी त्या पेटीत टाकायच्या,असे कारस्थान सुरू आहे. तसेच मतदारांना आता ‘ डुप्लिकेट ‘ मत पत्रिका दिल्या जात असल्याचा गंभीर […]Read More

राजकीय

नवी मुंबईत सर्वसामान्यांची घरे प्रकल्पातून वगळल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीची बैठक

मुंबई,दि. ९– नवी मुंबई महानगर पालिका अंतर्गत अनेक नामांकित विकासकांनी सन २०१७ पासून २०२२ पर्यंत अनेक प्रकल्प उभारून सर्वसामान्यांना परवडणारी घरे प्रकल्पातून वगळली. या प्रकरणी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समिती बैठक विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. विधानभवन येथे विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, नगरविकास अपर मुख्य […]Read More

राजकीय

उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी

नवी दिल्ली दि ९– उपराष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे तब्बल 452 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला रेड्डी यांना 300 मते मिळाली. एडवोकेट जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज उपराष्ट्रपती पदासाठी संसदेच्या दोन्ही […]Read More

महानगर

दहिसर टोल नाका वर्सोवा जवळ स्थलांतरित करण्यात येणार.

मुंबई दि. ०९ – मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप […]Read More

राजकीय

खासदारने केले उपराष्ट्रपती पदासाठी मतदान

दिल्ली, दि ९उपराष्ट्रपती पदासाठी सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. आज दिल्ली येथे झालेल्या निवडणुकीत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व इंडिया आघाडीतील संसदेतील सहकारी खासदार यांच्या […]Read More

महानगर

ईद ए मिलाददून नबी उत्साहात साजरी

मुंबई, दि. ९ – प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साज-या होणा-या ईद-ए-मिलाद मिरवणुक गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी आदी भागात काढण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. प्रेषित मोहम्मद यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त गोवंडी, शिवाजी नगर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

“हलाल लाइफस्टाइल टाउनशिप”  सारख्या प्रकल्पावर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र

पुणे, दि ९:  कर्जत येथील ‘सुकून एम्पायर’ या “हलाल लाइफस्टाइल टाउनशिप” प्रकल्पामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला केवळ मुस्लिम कुटुंबांसाठी बनवलेले म्हणून प्रचारित केले जात आहे, ज्यात नमाजासाठी जागा, सांप्रदायिक बैठकांसाठी सुविधा आणि “हलाल वातावरण” यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या प्रचारात्मक व्हिडिओमध्ये हिजाब परिधान केलेली महिला दिसते, या प्रकल्पाचे प्रवर्तक ‘सुकून एम्पायर’ […]Read More

महानगर

फेरबंदर येथील रस्त्यांवर खड्डेचं खड्डे

मुंबई, दि ९भायखळा पूर्व येथील म्हाडा कॉलनी परिसरात फेरबंदर येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे एवढे मोठे आहेत की रात्रीच्या वेळी हे खड्डे न दिसल्याने दुचाकी चालकांच्या अपघातात वाढ होत आहे. तसेच या खड्यात पाणी साचून कपडे खराब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या ठिकाणी म्हाडा सारखी मोठी लोकसंख्या असलेली वसाहत आहे. या ठिकाणी […]Read More

महानगर

अभिजित चव्हाण यांची शिवसेना सहकार सेलच्या दक्षिण मुंबई विभाग प्रमुख

मुंबई, दि ९शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे आणि खासदार आनंदराव अडसूळ सहकार सेना अध्यक्ष यांच्या आदेशाने सहकार सेनेच्या दक्षिण मुंबई विभागप्रमुख पदी अभिषेक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. चव्हाण यांनी सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य केले असून त्यांचा तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद दिले […]Read More