मुंबई, दि. १३:– ज्येष्ठ पत्रकार, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानामालेचे संस्थापक आदरणीय विजय वैद्य यांचा उद्या, रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रथम स्मृतिदिन आहे. या निमित्त रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे स्व. विजय वैद्य यांना बी ३७, गांजावाला […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ : देशभरात मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात पुढील काही महिन्यांत सतर्क राहण्याचे आणि डेंगू-मलेरियासारख्या आजारांविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा […]Read More
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ऑलिव्ह तेल हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याची माहिती पोस्ट केल्यानंतर, सोयाबीन तेल उत्पादक संघटना SOPA (Soybean Processors Association of India) ने या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. SOPA च्या मते, FSSAI सारख्या शासकीय संस्थेने कोणतेही विशिष्ट तेल आरोग्यदायी असल्याचे जाहीरपणे सांगणे हे दिशाभूल […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने देशातील राजकीय पक्षांच्या नोंदणी प्रक्रियेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, निवडणूक आयोगाच्या शुद्धीकरण मोहिमेला न्यायालयीन मान्यता दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने ३४५ नोंदणीकृत परंतु अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पक्ष २०१९ पासून कोणत्याही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांची कार्यालये […]Read More
चिपळुण, दि. १२ : कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बांधकामासाठी निसर्गाचा मोठा ऱ्हास होत आहे. त्याचबरोबर येथील जमिनी मोठ्या प्रमाणात परप्रांतियांना विकल्या जात आहेत. स्थानिक मध्यस्थांचाच या जमिनी विकण्यात मोठा हात असल्याचे वारंवार दिसून येते. असे असताना चिपळुण तालुक्यातील एका गावाने पुढाकार घेत आपल्या जमिनी परप्रांतियांना न विकण्याचा निश्चय केला आहे. चिपळुण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीने […]Read More
मंचर, दि. १२ : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात एक वादाचा मुद्दा निर्माण झाला आहे. चावडी चौकातील दर्ग्याचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली आणि त्यातून भुयारासह हिंदू स्थापत्य सदृश बांधकाम दिसल्याने वातावरण तापलं. या घटनेची बातमी पसरल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम संघटना आमने-सामने येऊन तणाव निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाने वेळीच मध्यस्थी करत तणाव शांत […]Read More
पुणे, दि. १२ : देशभरात प्रसिद्ध असलेल्या पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्यापीठाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. राज्य सरकारची प्राध्यापक भरतीची प्रक्रिया रखडल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या एकूण ३८४ पदापैंकी २३८ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. सध्या विद्यापीठात फक्त १० प्राध्यापक कार्यरत आहेत. या रिक्त पदांमुळे पुणे विद्यापीठातील शैक्षणिक घडामोडी आणि संशोधनासाठी लागणारी इकोसिस्टीम […]Read More
मुंबई, दि. १२ : मराठी वेबविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेली ‘मानवत मर्डर्स’ ही वेबसीरिज आता दुसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गिरीश जोशी यांच्या लेखनातून आणि आशिष बेंडे यांच्या दिग्दर्शनातून साकारलेली ही मालिका महाराष्ट्रातील मानवत गावात १९७०च्या दशकात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. पहिल्या भागात पोलिस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांच्या तपासकौशल्यावर आधारित गुन्हेगारी रहस्य उलगडण्यात आले […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने देशभरात फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी करत प्रदूषणविरोधी धोरण सर्वत्र लागू करण्याची गरज अधोरेखित केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या समस्येवर सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी फक्त दिल्लीपुरतीच फटाक्यांवरील बंदी मर्यादित ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. “जर दिल्लीतील नागरिकांना स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा अधिकार आहे, तर […]Read More
मुंबई, दि. १२ : नवी मुंबईतील उलवे नोड परिसरात उभारलेला बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर उद्घाटनाच्या तयारीत आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा ग्रीनफिल्ड प्रकल्प देशातील एक अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक विमानतळ ठरणार आहे. या विमानतळामुळे मुंबईतील […]Read More