Month: September 2025

महानगर

काँग्रेसचा सरकारला इशारा : RBI भूखंड विक्री रद्द करा, अन्यथा

मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरातील महत्त्वाच्या भूखंडाच्या विक्रीवरून महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेस पक्षामध्ये तीव्र राजकीय संघर्ष उफाळला आहे. काँग्रेसने या विक्रीला “एकतर्फी आणि फसवणूक करणारा निर्णय” ठरवत सरकारला ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. ही विक्री 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) मार्फत करण्यात आली. […]Read More

ट्रेण्डिंग

चिनी ‘बोन ग्लू’ , 2 मिनिटांत जोडेल मोडलेले हाड

चीनच्या वैद्यकीय संशोधन क्षेत्रात एक क्रांतिकारी शोध समोर आला आहे—‘बोन ग्लू’, जो फक्त २-३ मिनिटांत मोडलेली हाडं जोडण्याची क्षमता ठेवतो. चीनमधील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या नवीन बायोमटेरियलचा वापर हाडांच्या फ्रॅक्चरवर अतिशय प्रभावीपणे केला जात आहे. हे ग्लू पूर्णतः बायोडिग्रेडेबल असून, हाडं बरे झाल्यानंतर ६ महिन्यांत शरीरात विरघळते, त्यामुळे धातूच्या इम्प्लांट्सची गरजच उरत नाही. या […]Read More

पर्यावरण

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार ताडोबातील ८ वाघ

मुंबई, दि. १३ : केंद्र सरकारने पश्चिम घाटातील वाघांची संख्या वाढण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पश्चिम घाटातील घटलेली वाघसंख्या पुन्हा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमधून आठ वाघांची पकड करण्यास मंजुरी दिली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे, जो […]Read More

राजकीय

भाजपकडून मुंबईत मराठी दांडीयाचे आयोजन

मुंबई, दि. १३ : काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाजपने यंदाही मुंबईत मराठी दांडियाचं आयोजन केलं आहे.. मराठी बहुल भागात मराठी दांडियाचं आयोजन करून भाजपने मराठी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानात सलग चौथ्या वर्षी मराठी दांडिया आयोजित केला आहे. 27 सप्टेंबर ते 1ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज […]Read More

देश विदेश

भष्टाचार रोखण्यासाठी या देशात AI मंत्री नियुक्त

भ्रष्टाचाराच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून अल्बेनिया देशाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. 13 सप्टेंबर 2025 रोजी अल्बेनियाने डिएला (Diella) नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीला देशाची पहिली AI मंत्री म्हणून नियुक्त केले आहे. या निर्णयामुळे अल्बेनिया जगातील पहिला देश ठरला आहे ज्याने एका वर्च्युअल व्यक्तीला मंत्रीपद दिले आहे. डिएला ही पूर्णतः डिजिटल स्वरूपात अस्तित्वात […]Read More

देश विदेश

सुशीला कार्की ठरल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

काठमांडू,दि. १३ : नेपाळच्या राजकारणात ऐतिहासिक पाऊल उचलत माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे. काल (12 सप्टेंबर ) रोजी नेपाळच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पंतप्रधानांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आंदोलक तरुणांनी पारंपरिक राजकारण्यांवर विश्वास नसल्याने […]Read More

महाराष्ट्र

BSNL 4G साठी 930 गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी

मुंबई, दि. १३ : नवीन तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला राज्यातील 930 गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. BSNL ने दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये 4G सेवा वाढवण्यासाठी ‘ग्राउंड-बेस्ड टॉवर्स’ आणि संबंधित उपकरणांसाठी जमीन […]Read More

विदर्भ

गडचिरोलीच्या तरुण शेतकऱ्याने पिकवली मोत्याची शेती..

गडचिरोली दि १३:– धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता वेगळे प्रयोग करायला लागले आहेत. या जिल्ह्याच्या दक्षिण भागातील राज्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथील एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतातील तळ्यात चक्क मोती पिकवले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पारंपरिक धानपीकासोबत कापूस आणि मक्याचे पीक घेतले जाते. पण त्यापलिकडचा विचार सहसा कोणता शेतकरी करताना दिसत नाही. […]Read More

पर्यावरण

छोटा मटकाची गर्जना आता कैदेत

चंद्रपूर दि १३:- ताडोबाच्या जंगलात अनेक वर्षे आपला दबदबा निर्माण करणारा आणि पर्यटकांच्या मनाचा लाडका ठरलेला वाघ छोटा मटका (टी-१२६) आता जंगलाचा राजा राहिला नाही. काल त्याला चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधून नागपूरजवळील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये हलविण्यात आले. जंगलात मुक्तपणे हिंडणारा हा बलाढ्य नर वाघ उर्वरित आयुष्य कैदेतच व्यतीत करणार आहे. १२ मे रोजी छोटा […]Read More

महानगर

राज्य नाट्य स्पर्धेत यंदा ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’ची एन्ट्री

मुंबई दि १३:– चोवीस तास बातम्यांच्या विश्वात वावरणार्‍या पत्रकारांच्या मनात दडलेल्या संवेदनशीलतेला व सृजनशीलतेला रंगभूमीवर आता व्यासपीठ मिळणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ पहिल्यांदाच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत उतरणार आहे. सदस्यांच्या कलागुणांना स्टेज देण्याचा हा अभिनव प्रयत्न पत्रकारांच्या नाट्यप्रेमाचा उत्सव ठरणार आहे. ‘नाट्य शुक्रवार’ या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकारिणीचाही उत्साह वाढला आहे. संघाचे […]Read More