Month: September 2025

राजकीय

मणिपूर हिंसाचारावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई, दि १४: मणिपूरमधील सुरू असलेल्या हिंसाचारावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. मोदींनी मणिपूरला “भारताच्या मुकुटातील रत्न” असे संबोधले होते. या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंबेडकरांनी ते “क्रूर थट्टा” असल्याचे म्हटले आहे. आंबेडकरांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित […]Read More

अर्थ

काटेकोरपणे व्यवस्थापन कसे असावे याचा आदर्श म्हणजे ‘ज्ञानदीप‘ पतसंस्थाआ. प्रविण

मुंबई, दि १४- एखादी संस्था मोठी होते, वाढते, त्या संस्थेचे नेतृत्व तेवढे सक्षम व पारदर्शी असेल तरच हे होऊ शकते. जिजाबा पवार यांचे बहूआयामी नेतृत्व आहे. संस्थेच्या बाबतीत त्यांचा जिव्हाळा नेहमीच दिसून येतो. काटेकोरपणे व्यवस्थापन कसे असावे याचा आदर्श ज्ञानदीप संस्था आहे, असे कौतुकास्पद विधान भाजपा गटनेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण […]Read More

राजकीय

शिवसेनेने केले केंद्र सरकारविरुद्ध टीव्ही फोडून आंदोलन

मुंबई, दि १४पहलगाम आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याचा निषेध म्हणून शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी गिरगाव येथील आपल्या कार्यालयाबाहेर टीव्ही फोडून जोरदार आंदोलन केले. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी महिलांनी कुंकू,सौभाग्याचे ओटी आणि सिंदूर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाच्या मार्फत पाठवण्यात आले. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने केंद्र सरकारच्या भूमिकेविरुद्ध […]Read More

महानगर

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे

मुंबई, दि १४जश्ने उस्ताद-पार्कसाईट विक्रोळी ‘शिक्षण पुरस्कार’ या कार्यक्रमाला ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी उपस्थित राहून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. अशा उपक्रमांमधून अनेकांना नवी दिशा मिळते, हा खरोखरच कौतुकास्पद उपक्रम आहे असे मनोगड खासदार संजय पाटील यांनी उपस्थित्यांच्या समोर व्यक्त केलं. या […]Read More

पर्यावरण

लोणार सरोवर परिसरात नाचणारे मोर पर्यटकांना करत आहेत आकर्षित…

बुलडाणा दि १४ : – बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर आणि अभयारण्य परिसरामध्ये विविध जाती प्रजातीचे पक्षी, प्राणी वास्तव्यास आहेत.. त्यामध्ये मोरांची संख्या अधिक आहे.. सरोवर परिसरात असलेली मंदिरे आणि सरोवराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक भेटी देत असतात, याच परिसरात मनमुराद पणे नाचतानाचे मोराचे मनमोहक दृश्य पर्यटकांना पाहता आले.. डोणगाव येथील रुषांक […]Read More

मराठवाडा

बीड जिल्ह्यात यंदा सर्वत्र अतिवृष्टी….

बीड दि १४ — जिल्ह्यात मागील २४ तासांत एकूण सरासरी ४४.४ मी.मी. पर्जन्यमान झाले आहे. एकूण ८६ मंडळांपैकी १६ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस गेवराई तालुक्यामध्ये 91.6 मी.मी. झाल्याची नोंद आहे. यानंतर शिरूर कासार तालुक्यामध्ये 86.7 मी. मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील बीड तालुक्यामधील नवगण राजुरी, नाळवंडी, चऱ्हाटा, पारगाव सिरस, पाटोदा तालुक्यातील […]Read More

ऍग्रो

सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात…

वाशीम दि १४:– वाशीम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पीक मोठ्या संकटात आले आहे. सध्या सोयाबीन पीक ऐन शेंगधरणा अवस्थेत असताना अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पिवळसर होऊन जमिनीवर पडल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन पिकाला दीड ते दोन आठवडे कोरड्या हवामानाची गरज असते. मात्र, जिल्ह्यात सलग पावसामुळे पिकांची मुळे सतत […]Read More

ट्रेण्डिंग

इंडियन ओव्हरसीज बँकेत मोठी भरती

मुंबई, दि.१३ : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या १२७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार Indian Overseas Bank ची अधिकृत वेबसाइट iob.in किंवा ibpsonline.ibps.in वर फॉर्म भरू शकतात. इच्छुक उमेदवार ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. पदवीधर आणि पदव्युत्तर दोन्हीही या अर्ज करू शकतात. इंडियन […]Read More

महानगर

दिवंगत कर्मचारी सुरेंद्र शर्मा यांच्या पत्नीला मिळाला 40 लाखाचा धनादेश

मुंबई प्रतिनिधीबांद्रा येथील रामा इन्फ्राप्रोजेकट प्रा. लिमिटेड कंपनीचे दिवंगत कर्मचारी सुरेंद्र शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अनिता शर्मा आणि दोन मुलांना कंपनीच्या वतीने 40 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.रामा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे दिवंगत कर्मचारी सुरेंद्र शर्मा हे कुंभमेळ्याच्या वेळी कंपनीच्या कामासाठी प्रयागराजला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.उमाशंकर मिश्रा, व्यवस्थापकीय संचालक, […]Read More

महानगर

राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर एड. संग्रामसिंह शेवाळे यांची नियुक्ती

प्रतिनिधी. : महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड. संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी लंडन येथून आपलं कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ते भारतात परतले आणि शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी अनेक राज्यव्यापी उपक्रम राबवले. विद्यार्थी, युवक व इतर समाजघटकांच्या प्रश्नांवर ते सतत […]Read More