गडचिरोली दि १५:– गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील स्मशानभूमीवर अतिक्रमणाच्या वादातून अंत्यविधीच्या वेळीच हाणामारीची धग पेटली. नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील आरक्षित स्मशानभूमीत मृत झालेल्या गुरूनुले कुटुंबीय अंत्यसंस्कार करत असताना डुक्करपालकांचा गट तिथे आला. त्यांच्यात वाद वाढत गेला आणि पाहता पाहता दोन्ही गटांत तुफान मारामारी झाली. सात ते आठ जण जखमी झाले असून दोन्ही बाजूंनी अहेरी […]Read More
बीड दि १५– जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला आहे. नगर बीड रस्त्यावरील धानोरा येथील कांबळी तलाव भरला असून पुलावरून पाणी सुरू आहे. बीड कडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील नद्यांना पूर आले आहेत. दौलवडगाव महसूल मंडळात आणि गर्भगिरी डोंगर डोंगर रांगांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्या वाहत्या झाल्या, उंदरखेल येथील प्रकल्प भरला आहे. देवी निमगावच्या […]Read More
छ. संभाजीनगर दि १५– जिल्ह्यात पावसाने शनिवारी दिवसभर अधूनमधून रिमझिम व रात्रीतून दमदार हजेरी लावत २०० गावांत पाणीच पाणी केले. पैठण तालुक्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार दिसला. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेदरम्यान १० मंडळांत अतिवृष्टी झाली असून, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिती पडल्या, पत्रे उडाली, तर काही घरांमध्ये पाणी शिरले. सौर विद्युत […]Read More
नवी मुंबई, दि १४स्व. लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मानवंदना कार रॅलीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे सहभागी झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांशी संवाद साधून दि. बा. पाटील साहेबांच्या कार्याचा व त्यांच्या अपूर्व योगदानाचा गौरव केला. यावेळली माध्यमाशी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले…आपल्या अधिकारांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या या […]Read More
मुंबई, दि. १४– नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे. याबाबत नाफेड ने स्पष्ट केले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) […]Read More
मुंबई, दि १४: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत ह्यांचे रविवारी दुपारी १:०० च्या दरम्यान मुंबईत आगमन झाले .त्यांच्या स्वागतासाठी खास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबई सेंट्रल स्थानकावर हजर राहिले होते. ह्यावेळ बँड पथकाने राज्यपालांचे जोरदार स्वागत केलेले पाहून राज्यपालांनी सुद्धा जोरदार सॅल्युट ठोकला. देव व्रत गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत पण त्यांना सध्या महाराष्ट्राच्या राज्यपाल […]Read More
बीड दि १४…. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 14/09/2025 रोजी 11.30 वाजता गेट क्रमांक 3 व 4(हे 2 गेट) 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.सद्यस्थितीत पाहता मांजरा धरणाच्या सांडव्याची 4 वक्रद्वारे (क्र.1, 3,4 व 6) 0.25 मीटर ने चालू असून मांजरा नदीपात्रात 3494.28 क्युसेक्स (98.96क्युमेक्स) […]Read More
पुणे दि १४:– सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. साहित्य महामंडळाची बैठक पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य […]Read More
मुंबई, दि १४पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे लाखो लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या पुरामुळे राज्यातील सुमारे १५ लाख लोक बाधित झाले असून, यात सुमारे ३००० गावे आणि ५ लाख एकरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन चे डॉ फरहा अन्वर हुसेन शेख आणि अन्वर शेख […]Read More
मुंबई, दि १४हार्बर मार्गावरील महत्वाचे स्थानक म्हणून ओळख असणारे कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे आता गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा अड्डा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या दिशेने चढल्यावर आणि एकच्या दिशेने वडाळा येथून चढल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दुल्ले, भिकारी आणि चरसुल्ले थैमान मांडून बसलेले असतात. काही गर्दुल्ले रात्री देखील याच ठिकाणी राहतात […]Read More