नवी दिल्ली, दि. १५ : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक २०२५ मधील दोन महत्त्वाच्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र, संपूर्ण कायदा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे कायद्याची अंमलबजावणी सुरू राहणार असली, तरी स्थगित केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी पुढील आदेश येईपर्यंत होणार नाही. पहिली स्थगित तरतूद वक्फ बोर्डावर नियुक्त होणाऱ्या […]Read More
प्रवाशांच्या, विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 95 हजार सार्वजनिक वाहनांना GPS ट्रॅकिंग डिव्हाइस बसवण्यात आले आहेत. या डिव्हाइसमुळे रिअल-टाइम मॉनिटरिंग शक्य झाले असून, वाहनात एक SOS अलर्ट बटन देखील आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या (MMVD) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या व्हीकल लोकेशन […]Read More
मुंबई दि १५:– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने “स्वच्छता अभियान” राबविण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येणार असून, तब्बल ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पनवेल […]Read More
मराठी चित्रपट ‘दशावतार’ ने प्रदर्शित झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून, थिएटरमध्ये हाऊसफुल शोचा अनुभव मिळतो आहे. पहिल्या दिवशी सुमारे ५८ लाख रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी कमाई वाढून १.३९ कोटी रुपये झाली. तिसऱ्या दिवशी, म्हणजे रविवारी, […]Read More
पुणे, दि. १५ : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विमानतळाची उभारणी होणार आहे. या प्रस्तावित विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्यात आले असून, हे विमानतळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे आणि आसपासच्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतूक, उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. […]Read More
मुंबई, दि १५– सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही चित्रपट संस्कृति जिवंत ठेवण्यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असून याचे एक पाऊल म्हणजे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेले दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री […]Read More
नवी दिल्ली,दि. १५ : गुजरातमधील जामनगर येथे अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवले जाणारे वनतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र अलीकडेच चर्चेत आले होते. या केंद्रात प्राण्यांची खरेदी आणि विक्री नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांनी केला होता. विशेषतः हत्तींच्या हस्तांतरणासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने या […]Read More
मुंबई, दि. १५ : दादरमधील कबुतरखान्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. जैन समाजाकडून हा कबुतरखाना हटवण्याला विरोध करण्यात आला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल (14 सप्टेंबर) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तीन मूर्ती जैन मंदिरात एका नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन केले आहे.कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनाचे विकार आणि घाणीच्या […]Read More
मुंबई दि १५ — महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत. मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ७३ व ९६ नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून, तो तात्काळ लागू होणार आहे. ठरवलेले भाडेदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी […]Read More
पुणे, दि. १५ : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा निर्माण करणारे नाना पाटेकर हे केवळ एक प्रतिभावान अभिनेते नाहीत, तर ते सामाजिक कार्यातही तितकेच सक्रिय आहेत. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी “नाम फाऊंडेशन”च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय काम केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला असून, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम […]Read More