Month: September 2025

आरोग्य

कर्करोग उपचारासाठी आता महाकेअर फाऊंडेशनची स्थापना….

मुंबई दि ३० : राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय

मंगळवार, दि.३० सप्टेंबर, २०२५(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)कर्करोग रोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्चित. नागरिकांना कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार. त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित. राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार. यात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन होणार. कंपनीच्या भागभांडवलासाठी शंभर […]Read More

राजकीय

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती.

मुंबई, दि. ३०: विधान परिषदेच्या २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नेत्यांची समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते, काँग्रस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधान […]Read More

राजकीय

राज्यातील पहिल्या पाळीव प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण

मिरा-भाईंदर दि ३० :पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची व्यवस्था आता प्रत्यक्षात आली आहे. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्मशानभूमीचे म्हणजेचे नवघर स्मशानभूमीचे लोकार्पण आज सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून करण्यात आले. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची गंभीर समस्या आतापर्यंत पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह […]Read More

राजकीय

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा; हेक्टरी ५० हजार रु. मदतीची

‎मुंबई दि ३०: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता, राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.‎‎वंचित बहुजन आघाडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात मागणी केली आहे की, अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर जनावरांचेही मोठे […]Read More

बिझनेस

जीएसटी कमी झाल्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनि काळबादेवीतील व्यापाऱ्यांशी साधला

मुंबई प्रतिनिधी: केंद्रातील मोदी सरकारने जीएसटीचा स्लॅब कमी केल्याचा सकारात्मक परिणाम देशभरात जाणवू लागला असून महसुलात वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित जीएसटी बचत उत्सव कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी मुंबईतील काळबादेवी भागातील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना जीएसटी दरात केलेल्या बदलांचे महत्त्व नीट समजावून सांगितले. तसेच […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‌‘राजन खिंवसरा राष्ट्रीय बिलियर्डस्‌‍ आणि स्नुकर अकादमी‌’व्दारे पुण्यात नव्या युगाचा

पुणे, दि ३०पुणे शहरातील क्यु क्रीडाप्रकारामध्ये ‌‘राजन खिंवसरा राष्ट्रीय बिलियर्डस्‌‍ आणि स्नुकर अकादमी‌’च्या स्वरूपातून एका नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. ‌‘पॅशन मीट्स परफेक्शन‌’ म्हणजेच क्यु स्पोर्ट्‌‍सची आवड आणि ध्यास असलेल्या खेळाडूंना परिपूर्णतेकडे नेण्याचे कार्य होणाऱ्या या राष्ट्रीय अकादमीचे उद्घाटन कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्‌‍स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे (सोमवार, २९ सप्टेंबर) करण्यात आले. बिलीयर्डस्‌‍ अँड स्नुकर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बालकॅन्सर जनजागृतीसाठी ‘गोल्डन इव्हिनिंग’ सोहळाआगाखान पॅलेस सुवर्ण प्रकाशात उजळला –

पुणे, दि ३0सप्टेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय बाल कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बालकॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एक्सेस लाईफ असिस्टंट फाउंडेशन तर्फे पुण्यात सलग तिसऱ्या वर्षी ‘गोल्डन इव्हिनिंग’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने ऐतिहासिक आगाखान पॅलेसवर सुवर्ण प्रकाशात योजना केल्याने परिसर उजळून निघाला होता, आणि शहरात एक वेगळीच उर्जा व आशेचा संदेश […]Read More

विदर्भ

ऐन सणासुदीच्या काळात वाशीम जिल्ह्यात झेंडू शेतीचे नुकसान…

वाशीम दि ३० : खरीप हंगामात पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात झेंडू फुलाला मोठी मागणी असते. यंदा प्रती किलो सुमारे ७० रुपये भाव मिळत असून, एकरी २४ क्विंटल उत्पादनानुसार जवळपास १.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती.मात्र दसऱ्यापूर्वी झालेल्या अतिपावसामुळे वाशीम, रिसोड आणि […]Read More

महानगर

सर्वद फाऊंडेशनचे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न

मुंबई, दि. ३० : साहित्याकडे केवळ ललित लेखन म्हणून पाहणे योग्य नाही कारण ते समाज मनाचा आरसा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना लिहायला लावले तर समाजाला नक्कीच दिशा मिळेल तसेच भविष्यातील पिढीला स्फूर्तीदायी ठरेल, असे विचार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महादेव गो. रानडे यांनी व्यक्त केले. सर्वद फाऊंडेशनचे प्रथम राज्यस्तरीय साहित्य संमेलन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सहकार्याने नुकतेच […]Read More