Month: September 2025

राजकीय

मेट्रो मार्ग ४ व ४ए प्रकल्प : ठाणेकरांसाठी नवे श्वासवायू

मुंबई दि २१ :मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए (हिरवी मार्गिका) प्रकल्पाला गती मिळाली आहे. वडाळा–घाटकोपर–मुलुंड–कासारवडवली–गायमुख या मार्गावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प केवळ प्रवाससुविधा निर्माण करणार नाही, तर शहराच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासालाही चालना देईल. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मंत्री सरनाईक म्हणाले […]Read More

शिक्षण

आयआयएम, मुंबईचे उपकेंद्र आता पुण्यात

पुणे दि २१ : पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून शैक्षणिक नगरी पुण्यात नवे शैक्षणिक द्वार खुले होत आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयएम, मुंबईचे उपकेंद्र आता पुण्यात सुरु होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या डीन कमिटी आणि त्यानंतर Academic […]Read More

महानगर

मुंबई देवी मंदिरात अश्विन नवरात्रोत्सव 22 सप्टेंबर पासून

मुंबई, दि २१मुंबईचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मुंबादेवी मंदिर येथे यंदाचा अश्विन नवरात्र उत्सव सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी, गुरुवार ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी होईल. घटस्थापना २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०० ते ७.५९ या शुभमुहूर्तात होणार असून, ललिता पंचमी दिवशी, म्हणजे २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.०० ते […]Read More

राजकीय

प्रभादेवी येथील पादचारी पूल लगेच सुरू करा, शिवसेनेने दिला इशारा

मुंबई, दि २१प्रभादेवीचा वाहन वाहतुकीचा पूल नुकताच तोडून झाला. परंतु नागरिकांनी पूर्व पश्चिम जाण्यासाठी जो पादचारी पूल उपलब्ध आहे तो रेल्वेने अजूनही सुरू केला नसून तो दसरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या आत सुरू करावा असा सज्जड इशारा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. प्रभादेवी येथील पादचारी पुलाची […]Read More

गॅलरी

शिक्षकांचा सन्मान करणे हे माझे परम कर्तव्य, माजी नगरपाल डॉ

मुंबई, दि २१शिक्षक हा समाजाचा कणा असून उज्वल विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे उद्दिष्ट असते. अशा शिक्षकांचा सन्मान करणे हे मी माझे कर्तव्य समजतो असे जाहीर प्रतिपादन माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांनी काळाचौकी येथील शिवाजी विद्यालय येथे नुकताच लायन्स इंटरनॅशनल च्या वतीने शिक्षकांचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. या कार्यक्रमांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या संख्येने उस्फुर्त […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्व वादाचा सर्वोच्च बिंदू

पुणे, दि २१: प्रत्येक हिंदू ने आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी शास्त्राचा आधार घेणे महत्त्वाचे आहे. कृतज्ञता भाव जपला तरच संस्कृती टिकून राहील. यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्व वादाचा सर्वोच्च बिंदू आहे, असे मत ज्येष्ठ लेखक, कवी संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.  गेल्या १२०० वर्षांत […]Read More

क्रीडा

भाईंदर मधील १७ पहलवानांची निवड मुंबई विभागस्तरिय शालेय कुस्ती स्पर्धे

मीरा भाईंदर दि २०: मीरा भाईंदर जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा श्री गणेश आखाडा भाईंदर येथे शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी पार पडली. यात विविध गटांतील १७ पहिलवान मुंबई येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील शालेय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मीरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये यांच्या शुभ हस्ते आखाड्या चे पूजन करून […]Read More

साहित्य

‘साहित्यप्रेमी’च्या ‘वंदन आचार्यांना’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. २० : अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, ते क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केले, एवढेच नव्हे तर ते शिखरावर पोचले. असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही, असे विचार निवृत्त नगररचनाकार व लेखक पुरुषोत्तम लाडू ऊर्फ पी. एल. कदम  यांनी ओरोस येथे ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात मांडले. ओरोस येथील ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ […]Read More

कोकण

‘साहित्यप्रेमी’च्या ‘वंदन आचार्यांना’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ओरोस येथील ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठातर्फे आयोजित ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आम्ही साहित्यप्रेमी’चे समन्वयक सतीश लळीत यांनी  उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. आचार्य अत्रे यांची जयंती १३ ऑगस्टला झाली. त्यानिमित्त त्यांचे व्यक्तिमत्व, चरित्र व साहित्य यावर चर्चा करण्यासाठी ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. या […]Read More

देश विदेश

स्मृती मंधनाने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड

आज दिल्लीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मंधनाने एक ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४१२ धावांचा डोंगर उभा केला होता, ज्यामुळे भारताच्या विजयाच्या शक्यता कमी मानल्या जात होत्या. मात्र स्मृतीने फलंदाजीला आल्यानंतर सामना पूर्णपणे बदलून टाकला. तिने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलाच धक्का दिला.स्मृतीने केवळ […]Read More