मुंबई, दि २४: माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक व मराठा आरक्षण मागणीचे शिल्पकार स्वः आमदार अण्णासाहेब पाटील यांना २५ सप्टेंबर रोजी ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. नवी मुंबईत जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मौजे मंडळकोळे या छोट्याशा गावात अण्णासाहेब पाटील यांचा २५ सप्टेंबर १९३३ रोजी जन्म झाला. जेमतेम शिक्षण […]Read More
मुंबई, दि २४ : मराठा समाजासाठी राज्य सरकारने काढलेल्या २ सप्टेंबरच्या जीआरला कुणबी समाजाचा तीव्र विरोध असून, मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देणे तातडीने बंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कुणबी समाजन्नोती संघटनेचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या […]Read More
मुंबई, दि २४मुंबईतल्या प्रसिध्द दगडी चाळीतल्या देवीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.या देवीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून असंख्य देवी भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर काही देवी भक्त ओटी भरण्यासाठी दुबई, अमेरिकेतून हवाई मार्गाने मुंबईत दाखल होऊन आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देवीकडे साकडे घालत असतात.दगडी चाळीतल्या देवीकडे महिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असल्यामुळे […]Read More
लातूर दि २४ : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात पूरपरिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील पांढरी-वरली संगमस्थानाची आणि तीन नद्यांच्या संगमस्थळाचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत पावसाचे […]Read More
गडचिरोली दि २४ : गडचिरोलीच्या घनदाट जंगलात नक्षलवादाविरुद्ध राबविलेल्या सततच्या शोधमोहिमा आणि मोठ्या कॅडरच्या आत्मसमर्पणामुळे हादरलेल्या तब्बल सहा जहाल माओवाद्यांनी आज अखेर शस्त्र खाली ठेवत मुख्य प्रवाहाचा मार्ग स्वीकारला. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तीन पुरुष आणि तीन महिला माओवादी सहभागी होते. त्यांच्यावर मिळून तब्बल बासष्ट (६२)लाख रुपयांचे बक्षीस जाहीर […]Read More
पुणे, दि २४: पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्तीसंगीत, पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दगड जीवदया संस्था जवळ,आगम जैन मंदिर समोर, कात्रज,पुणे येथे करण्यात आले आहे. […]Read More
लातूर दि २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने अतिवृष्टीग्रस्त लातूर जिल्ह्यातील औसा येथे दाखल झाले असून ते औसा तालुक्यातील उजनी गावाकडे रवाना झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे उजनीत झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करणार आहेत. यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, आ. अभिमन्यू पवार याची उपस्थिती आहे. औसा येथून […]Read More
मुंबई, दि. २४ – राज्यात यंदाच्या वर्षी अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या 10 दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून आणि मत्स्य व्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. मंत्रालयात […]Read More
कोल्हापूर दि २४: आज अश्विन पक्ष तृतीया, शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस. दख्खनचा राजा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या कोल्हापूरच्या श्रीजोतिबा देवाची सोहम कमळ पुष्पा मध्ये राजेशाही थाटात खडी अलंकारिक महापुजा आज बांधण्यात आली. जोतिबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली. नवरात्रीच्या नऊ दिवस दररोज सकाळी श्रीजोतिबाची शाही पालखी मरगुबाई मंदिराच्या भेटीसाठी जाते. […]Read More
नांदेड दि २४ :- गोदावरी नदीवरील जायकवाडी, माजलगांव, येलदरी , सिद्धेश्वर, दिग्रस अशा सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नांदेड च्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या भागात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. गोदावरी नदी इशारा पातळीजवळ पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोदावरी नदीची इशारा पातळी ३५१ […]Read More