Month: September 2025

महानगर

तब्बल १८ वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तुरुंगातून सुटका

मुंबई दि ३(मिलिंद माने)– अंडरवर्ल्ड डॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या अरुण गवळी उर्फ डॅडी याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून तब्बल १८ वर्षांनी सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. गुन्हेगारी विश्वात अंडर वर्ल्ड डॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या अरुण गवळीला उर्फ डॅडीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंबईतील शिवसेना […]Read More

महानगर

मराठा आंदोलनानंतर BMC कर्मचाऱ्यांनी रातोरात साफ केला १ लाख किलो

मुंबई, दि. ३ : काल मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या समाप्तीनंतर, मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक अभूतपूर्व स्वच्छता मोहीम राबवली. आझाद मैदान परिसरात पाच दिवस चाललेल्या आंदोलनात हजारो आंदोलकांनी सहभाग घेतला होता. आंदोलन संपल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. याची दखल घेत BMC ने तातडीने कारवाई करत रातोरात तब्बल १०१ मेट्रिक टन म्हणजेच सुमारे १ […]Read More

बिझनेस

Intraday Trading वर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम लागू

मुंबई, दि. ३ : भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (SEBI) ने इंट्राडे ट्रेडिंगमध्ये वाढणाऱ्या अस्थिरतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून, विशेषतः इंडेक्स ऑप्शन्समध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ट्रेडिंगवर मर्यादा आणण्याचा उद्देश आहे. यामुळे बाजारातील पारदर्शकता वाढेल आणि रिटेल गुंतवणूकदारांचे संरक्षण होईल. नवीन नियमानुसार, प्रत्येक […]Read More

राजकीय

ओबीसींच्या विकासासाठी बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत

मुंबई, दि. ३ : मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर शासनाने मराठ्यांना देण्याबाबतचा जीआर काल प्रसिद्ध केला त्यानंतर ओबीसी समाज घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओबीसी समाज मराठ्यांचा ओबीसीकरणाला सुरुवातीपासून विरोध करत आहेत, जो सध्या आणखी तीव्र झाला आहे. यामुळे सरकारने ओबीसींसाठीही महत्वाचे पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणार आहे. […]Read More

राजकीय

MUTP तीन मधील नव्या मार्गिकांच्या उभारणीस मंजुरी

मुंबई दि ३ — मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयुटीपी – ३ ब) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून प्रस्तावित १३६.६५२ कि.मी. लांबीच्या व १४ हजार ९०७ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या खर्चातील शासनाचा ५० टक्के म्हणजेच ७ हजार ४५३ कोटी ७३ लाख रुपयांचा आर्थिक भार उचलण्यास […]Read More

शिक्षण

दोन वर्षांपासून रखडली बार्टी, सारथी आणि महाज्योतीची फेलोशिप

मुंबई, दि. ३ : निधी वाटपाच्या नवनव्या योजना जाहीर करत असताना विद्यमान सरकारचे शैक्षणिक क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदींकडे दुर्लक्ष होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी); महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)तर्फे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फेलोशिप देण्यात येते. […]Read More

महानगर

मुंबईसाठी २३८ वातानुकूलीत लोकल खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी

मुंबई दि ३– मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ व ३अ (MUTP-3 & 3A) या प्रकल्पात वातानुकूलीत २३८ लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांची खरेदी करण्यासाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाच्या हिश्श्यातून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी […]Read More

ट्रेण्डिंग

या देशांतून 2024 पर्यंत भारतात आलेल्या अल्पसंख्यांकांना विनाकागदपत्र राहण्याची मुभा

नवी दिल्ली, दि. ३ : पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध पासपोर्ट किंवा प्रवासी कागदपत्रांशिवाय देशात राहण्याची मुभा मिळेल. गेल्या वर्षी लागू […]Read More

सांस्कृतिक

पुरातन अंबरनाथ शिवमंदिर नगरपरिषदेच्या अतिक्रमणामुळे धोक्यात

ेअंबरनाथ. दि. ३ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील एक हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारं अंबरनाथचं शिवमंदिर परिरातील अनिर्बंध बांधकामांमुळे धोक्यात आले आहे. शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेलं हे हेमाडपंती मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, याच मंदिराच्या परिसरात स्थानिक नगरपरिषदेने केलेल्या बांधकामामुळे त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे RTI मध्ये उघड झाले आहे. RTI मध्ये समोर आलेल्या […]Read More

राजकीय

ठाणे वर्तुळाकार मेट्रो सह पुणे, नागपूर मेट्रोच्या वाढीव कामाच्या कर्जांस

मुंबई दि ३– ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. २) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) आणि पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो […]Read More