Month: August 2025

कोकण

कोकणात घराघरात गणपती बाप्पाचे आगमन…

रत्नागिरी दि २७:– कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी गणपती आगमन होत आहे. अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाचे आगमन होते. पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात डोक्यावरून तसेच शेतातून पायी मूर्ती आणण्याची परंपरा आजही गावोगावी जपली जाते. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्ये पासून […]Read More

महानगर

विरार येथे इमारत कोसळून दोघांचा मृत्यू…

वसई दि २७– वसई तालुक्यातील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजय नगर यांच्या मधील असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या चार माळ्याच्या इमारतीचा मागील भाग इमारती खाली असलेल्या चाळीवर कोसळला असून त्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. दुर्घटना घडली आहे त्यामध्ये रहिवासी अडकले असल्याने त्यांचे बचाव कार्य वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफ 2 […]Read More

विदर्भ

गणेश चतुर्थीला भामरागड जलमय..

गडचिरोली दि २७:– गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात अडकला आहे. कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाबरोबरच छत्तीसगड राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पर्लकोटा, पामूलगौतम आणि इंद्रावती नद्या प्रचंड वेगाने वाहू लागल्या आहेत. यामुळे भामरागडचा जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पुलं पाण्याखाली गेले आहेत, रस्ते बंद झाले आहेत आणि लोक अक्षरशः कैदेत सापडले आहेत. या बिकट […]Read More

राजकीय

सरकार उलथविण्याची भाषा चीड आणणारी !

मुंबई, दि. २६ :– महायुती सरकार तीन कोटी १७ लाख मते आणि ५१.७८ टक्के मताधिक्याने निवडून आले आहे. अशा मजबूत सरकारला उलथवण्याची भाषा चीड आणणारी आहे, असे सांगत महाराष्ट्र वैयक्तिक टीका कदापि सहन करणार नाही, खपवून घेतली जाणार नाही, अश्या शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ठणकावले. […]Read More

महिला

आशियाई नेमबाजी स्पर्धेत एकाच दिवसात भारताला 8 पदके

कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे सुरू असलेल्या १६व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने चमकदार कामगिरी केली आणि ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदके जिंकली. पदकतालिकेत भारताने २८ सुवर्ण, १० रौप्य आणि १२ कांस्य पदकांसह स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. महिलांच्या ट्रॅप स्पर्धेत भारताने वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात सुवर्णपदके जिंकली. नीरू धांडाने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक […]Read More

बिझनेस

Maruti च्या पहिल्या EV ला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

हंसलपूर, दि. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हंसलपूर येथे मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ‘ई-विटारा’ला हिरवा झेंडा दाखवून तिच्या उत्पादनाचा औपचारिक शुभारंभ केला. ही कार पूर्णतः भारतात तयार करण्यात आली असून, युरोप, जपानसह १०० हून अधिक देशांमध्ये तिची निर्यात केली जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनासाठी नवीन असेंब्ली […]Read More

देश विदेश

वनताराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून SIT स्थापन

नवी दिल्ली, दि. २६ : जामनगर (गुजरात) येथील वनतारा ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटरविरोधातील गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. रिलायन्स फाउंडेशनच्या अंतर्गत सुरू झालेल्या या प्रकल्पावर प्राण्यांची बेकायदेशीर खरेदी, स्थलांतर, आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाले आहेत. याशिवाय, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव […]Read More

ट्रेण्डिंग

MPSC ने रद्द केले तब्बल १२ प्रश्न

मुंबई, दि. २६ : MPSC द्वारे घेतली जाणारी प्रत्येक परीक्षाच काही ना काही कारणास्तव चर्चेत येत असते. गोंधळ घालण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या या आयोगाने आता एक नवीनच विक्रम केला आहे. आयोगाने गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा–२०२४ ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करताना तब्बल १२ प्रश्न रद्द केले आहेत. तर दोन प्रश्नांचे पर्याय बदलले आहेत. एकूण १४ […]Read More

देश विदेश

भारतावर उद्यापासून लागू होणार 50% अमेरिकन टॅरिफ

वॉशिग्टन डीसी, दि. २६ : अमेरिकन सरकारने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५% कर लादण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. दंड म्हणून लावण्यात आलेला हा कर भारतीय वेळेनुसार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३१ वाजल्यापासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी हा कर जाहीर केला. यापूर्वी व्यापार […]Read More

महानगर

नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद न्यायालयात

मुंबई, दि. २६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा प्रश्न पुन्हा पेटला असून आता हा मुद्दा न्यायालयात गेला आहे. केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे ठरवले आहे की […]Read More