नाशिक दि २८– मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून काल रवाना झाले. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या विविध मराठा संघटनांनी मुंबईकडे जाण्यासाठी जय तयारी केली असून नाशिकच्या कालिका माता मंदिर परिसरातून मोठ्या […]Read More
बीड दि २८…बीड जिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय. यामुळे बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या, बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत सुरू आहे. यामुळे बीड, लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मांजरा प्रकल्प सध्या ९९.२१ % क्षमतेने भरला […]Read More
नांदेड दि २८– नांदेड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून काल दुपार नंतर, कधी हलका तर कधी मध्यम तर कधी जोराचा पाऊस. आज सकाळपासून पावसाला जोरात सुरुवात झाली आहे. लोहा तालुक्यातील कापशी व आजूबाजूच्या परिसरात मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. सद्यपरिस्थितीत […]Read More
चंद्रपूर दि २८:– चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध असणाऱ्या जखमी छोटा मटका म्हणजेच सीएम वाघालाअखेर जेरबंद करण्यात आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी भागातून छोटा मटकाला जेरबंद करण्यात आले, ब्रम्हा या वाघासोबत झालेल्या झुंजीत मे महिन्यात छोटा मटका गंभीर जखमी झाला होता तर ब्रम्हा वाघाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अलीकडेच गाईंच्या एका कळपावर हल्ला […]Read More
पुणे दि २८:– ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. निमित्त होते, […]Read More
वसई दि २८:– पालघर जिल्ह्यातल्या विरार मध्ये रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मंगळवारी रात्रीपासून महानगरपालिका आणि एन.डी.आर.एफ च्या 2 टीम यांच्या माध्यमातुन घटनास्थळी मलब्या खालून नागरिकांना शोधण्याचं कार्य सुरू होत. विरार मधल्या नारंगी इथल्या रमाबाई अपार्टमेंट या चार […]Read More
मुंबई दि २७– गणेश चतुर्थी निमित्त उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी झालेले राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज सकाळी (बुध. दि.२७) राजभवन येथील आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केली तसेच देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठापना व आरतीला राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. नाशिक कारागृहातील कैद्यांनी तयार […]Read More
गडचिरोली दि २७:– गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी नक्षल चकमक उडाली असून पोलीस व C-60 जवानांच्या धाडसी कारवाईत ४ जहाल माओवादी ठार झाले आहेत.यात १ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. घटनास्थळावरून SLR, INSASसह शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून चकमक जवळपास आठ तास चालली असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. २५ ऑगस्ट रोजी गडचिरोली […]Read More
पुणे दि २७ — पुण्यात आज गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मूर्ती अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीत दाखल झाली व सवितानंद महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. दुसरे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतींची […]Read More
जालना दि २७:– मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले. मुंबईला रवाना होण्यापूर्वी जरांगेंनी अंतरवाली सराटीत गणरायाची पूजा करत आरती केली. यावेळी गावातील महिलांनी औक्षण करून जरांगेंना त्यांच्या उपोषण आंदोलनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले असून सातव्यांदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या […]Read More