लातूर दि २९– जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. या पावसामुळे नदी, ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे.त्यामुळे, 29 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या […]Read More
छ.संभाजी नगर दि २९–जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा विसर्ग वाढवला आहे. नाथसागरातून 75 हजार 456 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे 18 दरवाजे 4 फूट उचलून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे अशी माहिती सहायक अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. गोदाकाठच्या गावांनी सतर्क रहाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या नाथसागर धरणाची पाणी पातळी ही […]Read More
कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक, इटानगर आणि मुंबई ही देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे आहेत. तर पटना, जयपूर, फरीदाबाद, दिल्ली, कोलकाता, श्रीनगर आणि रांची ही महिलांसाठी सर्वात कमी सुरक्षित शहरांमध्ये आहेत. ही माहिती नॅशनल एनुअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमेन्स सेफ्टी (NARI) २०२५ मध्ये समोर आली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कोहिमा आणि इतर […]Read More
मुंबई, दि. २८ : म्हाडा कोकण मंडळाच्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घरे ठाणे शहर, जिल्हा आणि वसईमध्ये मोक्याची ठिकाणी आहेत. शिवाय त्यांचे दर ही अतिशय कमी आहेत. जवळपास 5,285 घरांसाठी ही सोडत असणार आहे. त्याच बरोबर ओरोस सिंधुदुर्ग, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व […]Read More
आशियातील सर्वात मोठे गणपती मंदिर गुजरातमध्ये आहे. अहमदाबादजवळ महेमदाबाद येथे वात्रक नदीच्या काठावर मोठे गणेश मंदिर आहे. या मंदिरालाही मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या नावावरून सिद्धिविनायक मंदिर असे नाव दिले आहे, पण हे मंदिर आकाराने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरापेक्षा खूप मोठे आहे. हे मंदिर फक्त भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात मोठे गणेश मंदिर आहे. येथे भगवान गणेशाची […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ : भारतीय वस्त्र उद्योगासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे—भारत सरकारने कापसाच्या आयातीवरील शुल्क ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्णपणे माफ केले आहे. या निर्णयामुळे वस्त्र निर्यातदारांना जागतिक बाजारात स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. सध्या कापसाच्या आयातीवर ५% बेसिक कस्टम्स ड्युटी (BCD), ५% कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC), आणि १०% […]Read More
मुंबईमध्ये पनीरऐवजी ‘चीझ अॅनालॉग’ या पनीरसदृश हलक्या पदार्थाची विक्री सुरू असल्याचं उघड झालं आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईतून ही गंभीर बाब समोर आली. अॅन्टॉप हिल परिसरात दोन डेअरींवर छापा टाकून तब्बल 550 किलो चीझ अॅनालॉग जप्त करण्यात आले असून खोट्या पनीरच्या माध्यमातून मुंबईकरांची फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने […]Read More
मुंबई, दि. २८ : या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केला आहे. गणेशोत्सवानिमित्त शासनाने रील बनवण्याची एक अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे, ज्यात विजेत्याला 1 लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस मिळू शकते. जर तुम्हाला रील्स बनवायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही […]Read More
मुंबई, दि. 28 : भाद्रपद गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली. राजाला अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तू या नेहमीच एक उत्सुकतेचा विषय ठरतो. या वर्षी चर्चा आहे ती डॉलर हाराची. गणेशाला देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी नवसापोटी मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले. […]Read More
ठाणे दि २८– जिल्ह्यातील भाईंदर परिसरात काही ठिकाणी मातीच्या मूर्तीदेखील नैसर्गिक तलावात विसर्जन करू देण्यास महानगरपालिकेने मनाई केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी मूर्ती रस्त्यावर ठेऊन आंदोलन सुरू केले होते. महानगर पालिका हद्दीतील मोर्वा, राई आणि मुर्धें या गावातील नागरिकांनी रस्त्यावर गणपती ठेऊन आंदोलन सुरू केले होते. पारंपरिक पद्धतीने आम्ही आमच्या गावात असणाऱ्या तलावात विसर्जन […]Read More