Month: August 2025

ट्रेण्डिंग

साताऱ्यातील महिला गणेशमूर्तीकाराला दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रण

सातारा, दि. ५ : सातारा जिल्ह्यातील परळी गावच्या महिला गणेश मूर्तिकार उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात व लाल किल्ल्यावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांनीच निमंत्रित केले आहे. टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन ही निमंत्रण पत्रिका नुकतीच त्यांना सुपूर्द केली. अंजना कुंभार यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गावापासून सुरू […]Read More

कोकण

स्मशान बांधण्यासाठी चोरले कोकण रेल्वेचे रुळ

पिंगुळी दि.५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील पिंगुळी येथे रेल्वेचे रूळ चोरी करून त्याचा वापर तेथीलच एका स्मशानभूमीच्या बांधकामासाठी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी कोकण रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून झाली असल्याचा आरोप केला जात आहे. चोरीच्या मालातून उभ्या केलेल्या स्मशानाच्या बांधकामाचे बिल घोटाळेबाजांनी राज्य सरकारकडून वसूल केल्याचा आरोप […]Read More

महानगर

तब्बल २८ वर्षांनंतर हत्येच्या आरोपाखालील व्यक्तीला अटक

ठाणे, दि. ५ : ठाणे जिल्ह्यात किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या केल्याच्या आरोपाखाली २८ वर्षांनी वसई येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने आज सांगितले. आरोपी राजेंद्र रामदुलार पाल, जो आता ५० वर्षांचा आहे, त्याने ओळख बदलून आणि ठिकाणे बदलून अटक टाळण्यात यश मिळवले. पोलिसांच्या देखरेखीपासून वाचण्यासाठी तो गेल्या तीन दशकांपासून […]Read More

देश विदेश

‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा होणार बंद

मुंबई, दि. ५ : भारतीय पोस्टाने आपल्या सर्वात जुन्या सेवांपैकी एक असलेल्या ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवेला 1 सप्टेंबर 2025 पासून ‘स्पीड पोस्ट मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे आता ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा इतिहासजमा होणार आहे. “समान सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून कामकाजाला अधिक सोपे बनवणे आणि ग्राहकांना अधिक सुविधा देणे” हा या बदलामागचा मुख्य […]Read More

महानगर

भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात?

मुंबई, दि. ५ — लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार […]Read More

राजकीय

खा. संजय दिना पाटील यांच्या प्रश्नाची शासनाने घेतली दखल!

विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे वजन तपासणार – शिक्षण मंडळ मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात खासदार संजय दिना पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल शिक्षण विभागाने घेतली असून त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल. त्याबाबतच्या सुचना शिक्षणाधिका-यांना देण्यात आल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे […]Read More

महानगर

*सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌

मुंबई, दि ५:लोअर परेल येथील सेंचुरी टेक्स्टाईल मिलच्या लीज वरील जागेसंबंधी कायदेशीर स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठविल्या नंतर या सहा एकर जमिनीचा ताबा मुंबई महानगरपालिकेकडे आला आहे.या जागेतील गिरणी कामगारांच्या घरासह अन्य जागेच्या सर्वेक्षणाचे काम महापालिकेने सुरू केले आहे.सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच खाजगी विकासकामार्फत निवासी संकुल उभारून, काही घरे सेंच्युरी टेक्सटाईलच्या जागेत राहत असलेल्या गिरणी कामगारांना […]Read More

सांस्कृतिक

मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्स मध्ये शोज मिळवून देण्यासाठी समिती स्थापन

मुंबई, दि. ५:– मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्स मध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्यासह या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. समितीने दीड महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा, मराठी सिनेमा जगला पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या कमी स्क्रीन, […]Read More

पर्यटन

एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार..

एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार.. मुंबई दि ५ — चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या […]Read More

राजकीय

माधुरी हत्तीणीला नांदणीत परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुंबई, दि. ५ :– नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री […]Read More