Month: August 2025

राजकीय

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असंवेदनशील केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस खासदारांचे ठिय्या आंदोलन

दिल्ली, दि ७मराठवाड्यातील काही जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. शासनाकडे वारंवार मागणी करून देखील खतपुरवठा करण्यात आलेला नाही. जालना जिल्ह्यात बोगस खताचे प्रमाण वाढले आहे. अधिकारी वर्गाला हाताशी धरून कृत्रिमरीत्या खताचा तुटवडा केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना चढ्या दराने खत खरेदी करावे लागते.वेळीच खत उपलब्ध न झाल्याने त्याचा पिकावर परिणाम होतो. शेतकऱ्यांना सामोरं जावे लागणाऱ्या […]Read More

पर्यावरण

‘वृक्षबंधन’ झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ठाणे दि ७– पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मो. ह. विद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात ‘वृक्षबंधन’ हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला. मोह विद्यालयाचे ४० विद्यार्थी, वनशक्ती […]Read More

ऍग्रो

सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर…

धाराशिव दि ७ — सोयाबीन या खरीप हंगामातील पिकाच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संशोधनातून तयार करण्यात आलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धाराशिव तालुक्यातील उपळा या गावातील २० शेतकऱ्यांच्या शेतात कार्यान्वित करण्यात आले आहे. यात स्वयंचलित हवामान केंद्र […]Read More

विदर्भ

सोयाबीनची वाटचाल ५ हजाराच्या दिशेने, तीन वर्षांनंतर दरात उच्चांकी झेप…

वाशीम दि ७:– वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत असून, लवकरच पाच हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४९५० रुपये इतका दर मिळाला असून, हा यंदाच्या हंगामातील उच्चांकी दर ठरला आहे. विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांनंतर एवढ्या दराची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षांपासून […]Read More

देश विदेश

वर्ष 2026 साठी RBI कडून महागाई दर निश्चित

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर ५.५ टक्के कायम ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या टॅरिफ धमक्यांवर आरबीआय थांबा आणि पहा धोरण स्वीकारत आहे. दर निश्चित करणाऱ्या पॅनेलनेही आरबीआयचा पवित्रा तटस्थ ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.नागपूर येथील ईटी मेक इन इंडिया एसएमई प्रादेशिक शिखर परिषदेत स्थानिक एमएसएमईंना बळकटी […]Read More

ट्रेण्डिंग

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वितरणावर देखरेख अशक्य

मुंबई, दि. ६ : मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी वितरणावर न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही, परंतु ज्या उद्देशासाठी हा निधी वापरला जात आहे, त्याचा गैरवापर होणार नाही, निधी वाटपात कोणतेही विचलन होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करत एक याचिका फेटाळून लावली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी ज्या कारणासाठी स्थापन […]Read More

ट्रेण्डिंग

‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून सन्मान

नवी दिल्ली, दि. ६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या प्रमुख उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एका महिन्यात या उपक्रमाने 3.53 कोटींहून अधिक नोंदणी आणि टेलिव्हिजनवर 21 कोटींहून अधिक प्रेक्षक मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या उपक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात

कोल्हापूर, दि. ६ : न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूरातील नांदणी मठातील प्रसिद्ध महादेवी उर्फ माधुरी हत्तीण रिलायन्सच्या वनतारा प्रकल्पात पाठवण्यात आली होती. यावरुन गेले आठवडाभर कोल्हापूरकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विविध माध्यमांतून दिसणारा कोल्हापूरकरांचा रोष पाहता,राज्य सरकारने देखील यात लक्ष घातले होते. अखेर आज वनताराने नमते घेतले असून लवकरच महादेवी कोल्हारात परतणार आहे. वनताराचे साईओ विहान कर्णीक […]Read More

महाराष्ट्र

उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप

उत्तरकाशी, दि. ६ : उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावात काल खीरगंगा नदीच्या उगमस्थानी अचानक आलेल्या जलप्रलयामुळे (flood) हांहाकार माजला. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील ५१ पर्यटक अडकले आहेत. ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली. यामध्ये नांदेडचे ११, सोलापूरचे ४ आणि इतर जिल्ह्यातील ३६ पर्यटकांचा समावेश आहे. याशिवाय बचावपथकाला अजून एक मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेतील […]Read More

खान्देश

सहावीतल्या चिमुरडीचा शाळेच्या गेटवरच हार्ट अटॅकने मृत्यू

नाशिक, दि. ६ : नाशिकमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणाऱ्या अवघ्या 12 वर्षांच्या विद्यार्थिनीचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. श्रेया किरण कापडी असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. ती इयत्ता सहावीत शिकत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली. मात्र शाळेच्या गेटमधून […]Read More