Month: August 2025

राजकीय

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्यगीत म्हणणे बंधनकारक

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्रातील सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणणे बंधनकारक असेल. जो कोणी या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, त्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. त्यामुळे आता मराठीसह इंग्रजी, हिंदी […]Read More

ट्रेण्डिंग

ITI मध्ये सुरु होणार २० नविन अभ्यासक्रम

मुंबई, दि. ७ : राज्यात “मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड”योजना राबविण्यात येणार आहे.विविध तंत्रशिक्षण प्राप्त ३० लाख युवक-युवतींची शासनाकडे नोंद आहे. या सर्वांना ईमेल करून त्यांची AI व्दारे परीक्षा घेण्यात येईल.यामध्ये पाच लाख युवक-युवतींना विविध परिक्षांती निवडण्यात येईल.यातुन पुन्हा चाळणी करून १ लाख उमेदवारांची निवड मूल्यांकन चाचण्या,स्पर्धा व हॅकाथॉनच्या माध्यमातून केली जाईल. अंतिम टप्प्यात २५,००० […]Read More

राजकीय

“सरकारचा दुटप्पीपणा आणि सत्तेचा उघड दुरुपयोग!”

मुंबई, दि ७राज्यातील सत्ताधारी सरकारचा दुटप्पी आणि भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “रॅपिडो” कंपनीविरोधात फिल्मी स्टाईलमध्ये कारवाई करत, ॲपवरून बुकिंग घेणाऱ्या बाईक सेवा बंद करण्याची भाषा केली होती. स्वतः सरनाईक यांनीच रॅपिडो बाईक थांबवून मोठा गाजावाजा करत ती कारवाई केली होती. पण खरा चेहरा समोर […]Read More

राजकीय

माजी आमदार बाबाजानी दुर्रानिंचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. ७ — राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, […]Read More

राजकीय

भाजपाशी हातमिळवणी करून निवडणूक आयोगाची प्रक्रियाच उध्वस्त करण्याची योजना

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने भाजपाशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप करत जोरदार टिका केली. मतदार यादीतील अनियमिततेवर १ तास ११ मिनिटे २२ पानांचे सादरीकरण दिले. राहुल गांधी यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि सांगितले की, मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत. राहुल म्हणाले की, लाखो कागदपत्रांची मॅन्युअली तपासणी करून आम्ही […]Read More

महानगर

कालचे कबुतरखान्याचे आंदोलन चुकीचे, आरोग्याचा प्रश्न महत्वाचा….

मुंबई दि ७– उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कबुतरे आरोग्यासाठी घातक आहेत , त्यामुळे नागरिकांचे आरोग्य जास्त महत्वाचे आहे, त्या पार्श्वभूमीवर काल दादर इथे झालेले कबुतरखान्याचे आंदोलन चुकीचे होते, मात्र त्यात जैन समाज नव्हता , त्यात दुसरेच कोणी घुसले होते असे मत कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे. आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी […]Read More

महानगर

ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर…

मुंबई दि ७:– मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांची निवड झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. शाल, श्रीफळ, रुपये ११,०००/-, आणि सन्मानचिन्ह […]Read More

महानगर

दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

मुंबई दि ७– दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राखी बांधली व ओवाळले. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर, भालिवली, जिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी महिलांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली राखी बांधली. रक्षाबंधनानिमित्त विविध संस्थांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

हत्तीण माधुरीच्या स्थलांतराचा पडसाद आता विदर्भातही..

वाशीम दि ७:– कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात अनेक वर्षांपासून असलेल्या ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ या हत्तीणेला अलीकडेच ‘वनतारा’ या संस्थेत हलविण्यात आले. स्थलांतरानंतर कोल्हापूरकर आक्रमक झाले होते मात्र अजूनही तिला परत पाठवले नसल्याने आता त्याचे पडसाद विदर्भातही उमटू लागले आहेत. त्याअनुषंगाने आज वाशीम शहरात मूक मोर्चा काढण्यात आला आहे. बालाजी मंदिरापासून सुरू झालेला हा […]Read More

राजकीय

गडचिरोलीच्या शिंदे गटात तुफान राडा..

गडचिरोली दि ७:– राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला आणि ते एकमेकांवर भिडल्याचा प्रकार गडचिरोलीच्या सर्किट हाऊस मध्ये बघायला मिळाला. शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून संदीप ठाकूर तर अहेरी जिल्हाप्रमुख म्हणून राकेश बेलसरे सध्या कार्यरत आहेत. […]Read More