Month: August 2025

विदर्भ

वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

वाशीम दि ८– वाशीम जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे वनोजा आणि पिंजरला जोडणारा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. परिणामी, या गावांचा संपर्क इतर भागांशी तुटला आहे. या पुरामुळे वनोजा गाव, वनोजा तांडा आणि तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपर्क […]Read More

मराठवाडा

आवक वाढल्याच्या कारणाने मिरचीचे भाव 100 वरून थेट 30 रुपयांवर…

जालना दि ८:– जालन्याच्या वालसावंगी परिसरात मिरचीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. मिरचीचे दर 100 रुपयांवरून थेट 30 रुपयांवर आले आहेत. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड झाल्याने उत्पादनही भरपूर झालं आहे. शेतकऱ्यांना येथे तयार झालेली मिरची तोडून पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते.मात्र,या बाजारात मिरचीची आवक अचानक […]Read More

देश विदेश

उत्तरकाशीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी गिरिश महाजन रवाना

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार (Rain) पाऊस व ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. अवघ्या 34 सेकंदाच्या ढगुफटीनंतर धारली गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. दरम्यान या घटनेत150 हून अधिक लोक गाडले गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असे असताना महाराष्ट्रातील 150 हून अधिक पर्यटक या दुर्घटनेत अडकल्याचीहि भीती व्यक्त केली जात आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

या तारखेला निवडले जातील नवीन उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. ७ : उपराष्ट्रपती धनखड यांनी अचानक दिलेल्या राजिनामान्यानंतर रिक्त झालेले हे पद आता भरले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने २०२५ साली होणाऱ्या उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत अधिसूचना आज ७ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली आहे. ही अधिसूचना “राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२” च्या कलम ४ (१) आणि (४) अंतर्गत जारी करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

अमेरिका भारतावर लादणार ५० टक्के टॅरिफ

मुंबई, दि. ७ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरुन ५० टक्के करण्याचा निर्णय काल जाहीर केला. त्यामुळे भारताकडून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील कर वाढेल. यामुळे भारतीय मालाला अमेरिकेत असलेली मागणी कमी होईल. टॅरिफमुळे वस्तू महाग होतील. त्याचा थेट फटका मागणीला बसेल. यामुळे अमेरिकेला निर्यात करणाऱ्या कंपन्यांचा नफा आटेल. त्यासोबतच याचा थेट […]Read More

राजकीय

अधिकाऱ्यांवरील अरेरावी व दादागिरीमुळे राजकीय कार्यकर्त्यांची बदनामी

पुणे, दि ७– पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना आंबेडकरी चळवळीत कार्यरत विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी व आजी-माजी नगरसेवक यांनी भेट घेऊन ठाम पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिष्टमंडळाने आयुक्तांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या कार्यशैलीचे समर्थन केले आणि पुणेकर नागरिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या बैठकीमध्ये […]Read More

राजकीय

एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती

मुंबई, दि. ७ — मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित खात्यांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. महाराष्ट्रातील एक पडदा चित्रपटगृह यांची अवस्था दयनीय असून या चित्रपटगृहाबाबत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अथवा अनुदान द्यावे अथवा अन्य मदत करावी […]Read More

राजकीय

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण

मुंबई, दि. ७ :– “इतिहासाचे विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” असे ठाम प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशीष शेलार यांनी आज येथे केले. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनाने या चित्रपटाचे तातडीने पुनर्परीक्षण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. काल शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संघटक निलेश भिसे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई, दि. ७ : सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमधील हातरिक्षा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याऐवजी, ई-रिक्षा चालवण्यास परवानगी दिली जाईल, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मानवाकडून ओढल्या जाणाऱ्या हातरिक्षा या अमानवी आणि आधुनिक काळात योग्य नाहीत. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला हातरिक्षा चालकांचे पुनर्वसन करण्याची योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई, न्या.के.विनोद चंद्रन, न्या.एन.व्ही. […]Read More

महानगर

कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम

मुंबई, दि. ७ : दादर येथील कबुतरखान्यावर बंदी घालण्याबाबतच्या मुंबई मनपाच्या निर्णयाविरोधात काल जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. याबाबत आज उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. दादरसह मुंबईतील कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी झाली. न्यायालयाने आजच्या सुनावणीत कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवली असून एक समिती नेमण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी विचार […]Read More