Month: August 2025

विदर्भ

बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस , शेतीचे मोठे नुकसान…

बुलडाणा दि १०: – बुलडाणा जिल्ह्यातील चिखली आणि सिंदखेडराजा तालुक्यात पुन्हा काल रात्री अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुकयात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने अचानक पणे पूर परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये पिंपळगाव सोनारा येथील ओढ्याला पूर आल्याने रात्रीपर्यंत या गावाचा संपर्क तुटलेला होता […]Read More

सांस्कृतिक

“गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४” विजेत्यांचा भव्य गौरव सोहळा संपन्न…

मिरा-भाईंदर दि १० :– घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची सजावट करणाऱ्या भक्तांचे मनोबल वाढवणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे, पाठीवर शाबासकीची थाप देणे तसेच सणासुदीच्या काळात संस्कृतीचे जतन व प्रसार करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४ आणि […]Read More

पर्यटन

नागपूर -पुणे वंदे भारत आजपासून सुरू

नागपूर दि १०– नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ येथून नागपूर अजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळेला नागपूर रेल्वे स्थानकावर शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वंदे भारत त्यांच्या ट्रायल रन चा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी […]Read More

राजकीय

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई, दि.१० – भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे. सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, […]Read More

गॅलरी

औषधांसोबत मिळाला स्नेहाचा धागा…

ठाणे, दि ९ ठाणे “रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा फक्त एक ‘केस’ किंवा ‘रुग्ण क्रमांक’ नसतो, तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो,”महिला कर्मचारी यांनी रुग्णांच्या मनगटावर राखी बांधली, तेव्हा त्या धाग्यात फक्त दोरा नव्हता, तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीची ऊब असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले. आज ठाणे सिव्हिल रुग्णालयात रक्षाबंधनाचा […]Read More

महानगर

ठाण्यात हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

ठाणे, दि ९: ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि ‘शिवमुद्रा प्रबोधिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवमुद्रा प्रबोधिनी चे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने आज रघुवंशी महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या १६ वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढविणे हा आहे. या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी […]Read More

महानगर

गणेशोत्सवात परीक्षा घेऊ नका शिवसेनेने दिले निवेदन

मुंबई, दि ९शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई क्र.१२ च्या वतीने महाप्रज्ञा पब्लिक स्कूल,दादी शेठ अग्यारी लेन येथे गणेशोत्सवाच्या काळामध्ये परीक्षा घेऊ नये याबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज मचाडो यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली. संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव अगदी जल्लोष साजरा करण्यात येतो. दक्षिण मुंबई ही उत्सवांची आणि […]Read More

राजकीय

राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे

मुंबई दि. ९ —भा.ज.प च्या प्रवक्तेपदी राहिलेल्या एका व्यक्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी शिफारस करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. प्रवक्ता हा त्याच्या राजकीय पक्षाचा चेहरा असतो असे म्हंटले जाते. मग, एका राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा कशी असू शकते असा प्रश्न काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. या संबंधात […]Read More

विदर्भ

सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका….

वाशीम दि ९:– वाशीमच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान येथील सिंचन तलावाला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून तलावाची भिंत खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश जलस्त्रोतांनी पातळी गाठली आहे. मात्र पिंपरी हनुमान धरणाच्या भिंतीवरील दोन्ही बाजूंची माती वाहून गेली असून मध्यभागी फक्त तीन फूट जागा शिल्लक आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जर […]Read More

राजकीय

*हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजेआमदार सचिन अहिर

मुंबई, दि ९:सन १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणार्पणातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी गावालिया टॅन्क मैदानावर उभे करण्यात आलेले हुतात्मा स्मारक आजच्या तरुणांचे प्रेरणास्थान आहे. परंतु त्याचे महत्व कायम राहणार का, हा आज खरा मूलभूत प्रश्न आहे, असे विचार राष्ट्रीय मिल मंजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन आहीर यांनी येथे बोलताना […]Read More