Month: August 2025

पश्चिम महाराष्ट्र

श्री कसबा गणपतीच्या चांदीच्या मूर्तीची विधिवत पूजा ग्रामदैवत श्री कसबा

पुणे, दि ११: पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंदिरात एक ऐतिहासिक आणि भक्तिभावाने ओथंबलेला सोहळा संपन्न झाला. वीरासनातील नवीन चांदीच्या श्रीमूर्तीचे शुद्धीकरण, अभिषेक आणि सहस्त्र आवर्तन या पावन धार्मिक विधींचे आयोजन ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी करण्यात आले.ही नवी चांदीची श्रीमूर्ती हे केवळ एक धातूचे प्रतिक नाही, तर पुणेकरांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि […]Read More

राजकीय

सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन*

पुणे, दि ११ स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येणारा पाठपुरावा, त्याला मिळणारी लोकप्रतिनिधींची साथ, मंत्री व खुद्द मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आबेडकर हॉकी स्टेडीयम चिखलवाडी, बोपोडी येथे समान पाणी पुरवठा प्रकल्पा अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या ३० […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पौलस वाघमारे यांचा शुक्रवारी षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा

पुणे, दि ११: पौलस वाघमारे फ्रेंड सर्कलतर्फे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अध्यक्ष पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा, पुस्तक प्रकाशन आणि निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. […]Read More

गॅलरी

105 वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक उत्तम कुडके आझाद मैदानात आंदोलनात

मुंबई, दि ११105 वर्षाचे स्वातंत्र सैनिक उत्तम निवृत्ती कुडके हे रा. पीठी, ता, पाटोदा, जि. बीड, येथील असून त्यांनी विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलनात बसले आहेत. सन 1952 साली महाराष्ट्र सरकार ने जवळपास 17 हजार एकर जमीन बेकार्यदेशिर रीत्त्या विना मोबद‌ला ताब्यात घेतली असल्याने त्याचा रीतसर मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. तसच विधानसभा निवडणुक 2024 मध्ये […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विविध मागण्यांसाठी स्टेशन मास्टरांचे आंदोलन

पुणे, दि ११– ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन (AISMA) पुणे मंडळाच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन करण्यात आले. पुणे रेल्वे मंडळातील शेकडो स्टेशन मास्टर्स, सहाय्यक कर्मचारी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आंदोलनानंतर मंडळ रेल्वे व्यवस्थापकांना १९ प्रमुख मागण्यांचे सविस्तर स्मरणपत्र देण्यात आले. या आंदोलनात AISMA माजी राष्ट्रीय महामंत्री धनंजय चंद्रात्रय, मंडल […]Read More

महानगर

राष्ट्रीयकृत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात ठिय्या आंदोलन

मुंबई, दि ११ :राष्ट्रीयकृत बँकेतून सेवा निवृत्त झालेले अधिकारी,कर्मचारी यांनी प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी देशातील सर्व राज्याच्या राजधानी ठिकाणी एकाच दिवशी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन झाले. ऑल इंडिया बँक पेन्शनर्स आणि रिटायरिज असोसिएशनच्या जनरल कौन्सिलच्या (एआयबीपीएआरसी)राज्यसचिव शेखर कदम यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.आंदोलनात उपाध्यक्ष रवींद्र शेट्टी,चंद्रशेखर बारजगे, सुधीर पोवार […]Read More

राजकीय

विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी

मुंबई दि ११– शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप […]Read More

महानगर

निवडणूक आयोगाचा ठाण्यात तीव्र निषेध

ठाणे दि ११ : निवडणूक आयोगाने एका घरात 80 लोक विविध जाती आणि धर्माचे दाखवले आहेत. हे कौतुकास्पद आहे. 85 वर्षाचे शरद पवार साहेब तसेच खरगे साहेब देशाची लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले jआहेत. पाच वर्ष नंतर येणारी निवडणूक लोकांच्या मनात काय आहे. हे दाखवून देत आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या हातातील बाहुले आहे. देशात लोकशाही […]Read More

महानगर

ठाण्यात शिवसेना (ठाकरे गट) कडून ‘जनआक्रोश’ आंदोलन

ठाणे, दि ११ महाराष्ट्रातील राजसरकारच्या भ्रष्ट कारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना (ठाकरे गट) तर्फे ठाणे स्टेशन परिसरात भव्य ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केले. यावेळी शिवसेना नेते नरेश मनेरा, केदार दिघे तसेच ठाणे जिल्ह्यातील उभाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]Read More

विदर्भ

वर्धा नदीवरील पूल बनला धोकादायक, पुलाला मध्येच पडलाय खड्डा…

चंद्रपूर दि ११:–चंद्रपुरात वर्धा नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्दळीच्या भोयेगावच्या कमकुवत पुलाने वाहनधारक चिंतेत पडले आहेत. यापुलाला मध्येच खड्डा पडलाय त्यामुळे वाहने संथगतीने जात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या औद्योगिक कॉरिडॉरला या मार्गावरील हा पूल जोडतो. मात्र बांधकाम विभागाचे पुलाच्या स्थितीकडे दुर्लक्ष आहे. यंदा या पुलावरून केवळ एकदा पाणी चढले आहे. […]Read More