Month: August 2025

पर्यावरण

इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी

मुंबई, दि. १२ : २०२४-२५ सुरुवातीच्या सहामाहीत उत्तर प्रदेशने तेल कंपन्यांना सर्वाधिक इथेनॉल (ethanol)पुरवठा करून देशात प्रथम स्थान मिळवले आहे. जूनअखेर उत्तर प्रदेशने ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राने ६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे, इथेनॉल निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र आघाडीवर असूनही, प्रत्यक्षात पुरवठ्याच्या […]Read More

क्रीडा

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत होणार पारंपरिक

मुंबई, दि १२ कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभाला बुधवारी कुर्ला येथे जल्लोषात सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. […]Read More

राजकीय

महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार

मुंबई, दि. १२ — महाराष्ट्रातील पारंपारिक वस्त्र व जी सुंदर वीणकामाचा एक अविष्कार आहे तसेच ज्याला साडयांची महाराणी म्हणून ओळखले जाते अशी महाराष्ट्राची पैठणी आता लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केलेली विनंती संग्रहालयाने मान्य केली आहे. शूर मराठा सरदार रघुजीराजे भोसले यांची ऐतिसाहिक तलवार ताब्यात घेण्यासाठी […]Read More

ट्रेण्डिंग

न्या यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग

नवी दिल्ली,दि. १२ : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा विरोधात सादर करण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावाला आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्तावावर एकूण 146 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते दोघेही सहभागी आहेत. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महाभियोग प्रस्ताव आणता […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ब्रम्हकुमारी डॉ. त्रिवेणी रमेश बहिरट ‘”बोपोडी भूषण २०२५’’ पुरस्कारने सन्मानित

पुणे, दि १२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला बोपोडी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ब्रहमकुमारी डॉ. त्रिवेणी दीदी बहिरट यांना अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन ‘केल्याबद्दल केनेडी युनिव्हर्सिटीच्या वतीने “अघ्यात्मिक विज्ञान विषयात ” डॉक्टरेट ‘’ प्रदान करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार बोपोडीतील सर्व प्रतिष्ठीत मान्यवरांच्या वतीने दीदींना “बोपोडी भूषण २०२५’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बोपोडी […]Read More

महानगर

खासदार निधीतून कामाचे शुभारंभ!

मुंबई, दि १२ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या खासदार निधीतून घाटकोपर पुर्व, नायडू कॉलनी येथील वेल्डन क्रिडा मंडळाच्या खुले सभा मंडप (शेड) उभारणीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांचा शुभारंभ विभागप्रमुख मा. श्री. तुकाराम (सुरेश) पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी महिला विभाग संघटक प्रज्ञाताई सपकाळ, समजसेविका व युवासेना सदसया राजोल संजय पाटील व […]Read More

सांस्कृतिक

दहीहंडीच्या जल्लोषाला सुरुवात!

मुंबई, दि १२ :मुलुंड येथील विभाग अधिकारी रोहित चिकणे यांच्या सौजन्याने जाणता राजा गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यास ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील उपस्थित राहून सर्व गोविंदांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उत्साह, ऊर्जा आणि एकोप्याने भरलेला हा पारंपरिक जल्लोष यावर्षीही गगनाला भिडो, हीच सदिच्छा! अशी शुभेच्छा खासदार संजय पाटील यांनी यावेळी दिली.ML/ML/MSRead More

राजकीय

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरतीला हिरवा कंदील

मुंबई दि १२– महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून […]Read More

पर्यटन

रक्षाबंधनानिमित्त एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…!

मुंबई दि.१२ — यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री […]Read More

राजकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आंदोलनासाठी मुस्लिम समुदायाच्या पाठिंबा

पुणे, दि १२: मंगळवार पेठ येथील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावना लगतच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे तसेच या आंदोलनामध्ये मुस्लिम समुदायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी  […]Read More