यवतमाळ दि १४ — यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 25 सेंमी ने उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून 126 घनमीटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी […]Read More
कोल्हापूर दि १४–कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रिया गेल्या तीन दिवसात यशस्वीपणे पार पडली. आज सकाळी साडेआठ वाजता मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी सुरू झाले. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय पूरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मूर्तीची संवर्धानासाठी पाहणी करण्याची मागणी केली […]Read More
मुंबई, दि. १३ : गेल्या पंधरादिवसांपासून दादरमध्ये भर वस्तीत असलेल्या कबुतरखान्याचा मुद्दा पेटला आहे. याबाबत जैन समाज आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये कबुतरे महत्त्वाची की नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे या दोन मुद्द्याबाबत संघर्ष सुरु आहे. मुंबई मनपाने न्यायालयाच्या आदेशाने कबुतरखाना बंद करुनही काही जैन धर्मिय तो सुरु करावा यासाठी आक्रमक होत आहे. या सर्व प्रकरणाबाबत आज मुंबई […]Read More
कोल्हापूर, दि. १३ : कोल्हापूरच्या खिद्रापूर गावातील ग्रामपंचायतीत एक विचित्र प्रकार घडला आहे. अविश्वास ठरावावरील मतदानात स्वतःविरोधातच मतदान करून एका महिलेने उपसरपंचपद गमावले आहे . हा प्रकार समजल्यानंतर महिलेने तहसीलदारांपुढे गोंधळ घातला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सदर महिलेने हा प्रकार मुद्दाम केला की अनावधानाने घडला हे अजून स्पष्ट झाले नाही. झाल्या प्रकाराची कोल्हापूरच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ : सीमा सुरक्षा दलाने गट ‘क’ मधील हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1,121 रिक्त पदे भरली जाणार असून, देशभरातील पात्र उमेदवार 24 ऑगस्ट 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. बीएसएफ भरती मंडळ लवकरच याबाबतची अधिकृत जाहिरात […]Read More
मुंबई, दि. १३ : १५ ऑगस्टपासून केंद्र सरकार वार्षिक FASTag सुरू करणार आहे. या नवीन नियमामुळे टोल प्लाझा ओलांडणे आणखी सोपे होईल. ही FASTag annual pass योजना प्रामुख्याने कार, जीप आणि व्हॅन सारख्या खाजगी वाहनांसाठी लागू होईल. त्यात जड व्यावसायिक वाहनांचा समावेश नाही. वार्षिक फास्टॅगसाठी तुम्हाला ३००० रुपये रिचार्ज करावे लागतील. यामध्ये २०० फेऱ्या मोफत […]Read More
मुंबई, दि. १३ : BSNL ने खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एक अतिशय आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा नवा ₹1999 चा असून, या प्लॅनमुळे सतत रिचार्ज करावं लागणार नाही. वर्षभर सिम कार्ड अॅक्टीव्ह ठेवण्यासोबतच, दिवसाला दीड जीबीपेक्षा डेटा, अमर्याद कॉलिंग सुविधा अशा सगळ्या सुविधा या एका प्लॅनमुळे मिळणार आहेत. इतर खासगी कंपन्यांच्या वर्षभरासाठीच्या […]Read More
मुंबई, दि. १३ : राज्यातील सर्वात मोठा सार्वजनीक उत्सव म्हणजे गणेशोत्सव. हा उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महामुंबई मुंबईत हजारोंच्या संख्येने असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. हा उत्सव सुरळीतपणे पार पडावा यासाठी राज्य शासनही सतर्क झाले आहे. उत्सव पर्यावरणपुरक व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांनी ‘डीजे’चा वापर […]Read More
मुंबई, दि. १३ — मुंबई – गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोयीतून सुटका व्हावी यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णायक बैठक घेत तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देत कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खा. सुनिल तटकरे […]Read More
मुंबई, दि. १३:– राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईल, या उद्देशाने ‘अपना भांडार’ या नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारे चालवली जातात. भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी भांडारे उभारून खरेदी-विक्रीची साखळी उभारण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा मंत्री रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या […]Read More