वाशीम दि १६:– वाशीम जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून मागील एका तासापासून सध्या संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वाशिम तालुक्यातील किनखेडा गाव परिसरात आज दुपारी ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचले तर अनेक घरांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असून घरगुती साहित्याचे नुकसान […]Read More
लातूर दि १६:– लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प ९० टक्के क्षमतेने भरला आहे. पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दुपारी सव्वादोनच्या दरम्यान मांजरा प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात ३४९४.२८ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी काठावरील […]Read More
छ. संभाजीनगर दि १६ : जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या शिवना टाकळी धरण 93.49 टक्के भरले आहे. त्यामुळं धरणाचे तीन दरवाजे 20 इंचानी उघडण्यात आले आहे. तीन दरवाजे 2280 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर लासुर स्टेशन येथे शिवना नदीला […]Read More
ठाणे दि १६– संस्कृति युवा प्रतिष्ठान दही हंडी या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दही हंडी उत्सव कार्यक्रमात आज १० थरांची विश्वविक्रमी सलामी देण्यात आली . कोकण नगर गोविंदा पथकाने हे दहा थर रचून विश्वविक्रम नोंदविला आहे.Read More
पुणे प्रतिनिधी: सिटी ग्रुप ॲमानोरा येस्स फौंडेशनतर्फे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सहा मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्काराने तर ससून, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ससून रुग्णालयातील महात्मा गांधी सभागृहात बुधवारी (दि. 15) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. […]Read More
ठाणे दि १६: — डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोडवरील सीमंतिनी सोसायटी ही सुमारे ४५ वर्ष जुनी इमारत आज अचानक खचली. इमारतीच्या भेगा पडल्याचे लक्षात आल्यानंतर सतर्क झालेल्या रहिवाश्यांनी तातडीने इमारत खाली केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला असून इमारतीच्या आजूबाजूचा […]Read More
परभणी दि १६ — जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने जन जीवन विस्कळीत झाले आहे.पुर्णा तालुक्यात बानेगाव, माहेर,फूलकळस ,मुंबर ,देवूळगाव दु.,धानोरा काळे या पाच गावामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आलाय त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने काल दिवसभर वाहतूक बंद होती. पुराच्या पाण्यामुळे सोयाबीन,कापूस, सह भाजीपाल्याचे आणि […]Read More
मुंबई, दि १६ : भांडुप येथील समजसेविका व युवा सेना सदस्य राजोल संजय पाटील यांनीकाल भारताचा ७९ स्वातंत्र्यदिवस भांडुप, मुलुंड, कांजूरमार्ग व ईशान्य मुंबईच्या इतर मतदार क्षेत्रात साजरा केला. याप्रसंगी आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या विविध कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांसोबत संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्यातसेच भांडुपच्या साई हिल सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात […]Read More
पुणे ,दि. १५ : सिंहगडावर ट्रेकिंगसाठी जाण्यापूर्वी मोबाइल अॅपद्वारे पूर्वनोंदणी करणे आता बंधनकारक होणार आहे. नोंदणीची अट लागू होणारा सिंहगड हा राज्यातील पहिला किल्ला ठरणार आहे. वन विभागाने यासाठी ‘किल्ले सिंहगड’ हे विशेष मोबाइल अॅप विकसित केले आहे. सुरुवातीला ही योजना काही दिवस प्रायोगिक स्वरूपात राबवली जाईल आणि नंतर ती बंधनकारक केली जाईल. सुट्टीच्या दिवशी […]Read More
कोल्हापूर, दि. १५ : अवयवदान पंधरवडा मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात एक चळवळ म्हणून राबविली गेली. राज्यात अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेऊया, असे आवाहन करीत त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या कार्यक्रमात आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचे […]Read More