Month: August 2025

कोकण

जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी…

रत्नागिरी दि १८:– खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती गंभीर होत चालली आहे. आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत जगबुडी नदीवरील भरणे नाका पुलाजवळ पाणीपातळी ७.४० मीटर इतकी नोंदवली गेली असून, ही पातळी धोक्याच्या ७ मीटर रेषेपेक्षा वर गेली आहे. पाण्याची वाढ अजूनही सुरूच आहे.खेड नगरपरिषदेने नागरिक आणि व्यापारी बांधवांना तातडीचा इशारा दिला आहे. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह सुरक्षित […]Read More

मराठवाडा

सोमठाणा धरणात पाण्याची मोठी आवक, आतापर्यंत 72.66 टक्के भरले…

जालना दि १८ :– मुसळधार पावसामुळे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सध्या धरण 72.66 टक्के भरले असून, ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ दोन फूट बाकी आहे. बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील नदी, नाले, ओढे आणि साठवण तलावांमध्ये पाण्याचा मोठा […]Read More

मराठवाडा

मुसळधार पावसामुळे पाच वर्षांनंतर प्रथमच कुंडलिका नदीला पूर…..

जालना दि १८:– मुसळधार पावसामुळे जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर आला आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच या नदीला पूर आला असून नदी ओसंडून वाहत आहे. मागील 3 ते 4 दिवसांपासून जालना जिल्हाभरात मुसळधार जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदी, नाले ओसंडून वाहू लागलेत. जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीलाही मुसळधार पावसामुळे पूर आला असून पाच […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट; राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

कोल्हापूर दि १८– शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित उघडले आहेत. दरम्यान, हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरण […]Read More

कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार नद्यांच्या पातळीत वाढ; पुराचा धोका कायम…

रत्नागिरी दि १७:– रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यात नारंगी आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, त्यामुळे अनेक अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत.खेड-बहिरावली रस्त्याजवळील सुसेरी येथे नारंगी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने खाडीपट्टा विभागातील सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन बोरज धरणातून […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू

कोल्हापूर दि १७ — मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्किट बेंच मध्ये कोल्हापूर सह सांगली ,सातारा , सोलापूर , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या […]Read More

महानगर

उत्सव, परंपरा आणि एकोप्याचा जल्लोष!गोविंदा रे गोपाळा!

मुंबई, दि १७दहिहंडीच्या उत्साहात सहभागी होत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी त्यांच्या मतदार क्षेत्रात अनेक दहीहंडी कार्यक्रमांना भेट दिली.“प्रत्येक ठिकाणी गोविंदांचा उत्साह, जोश आणि भक्तिभाव अनुभवला. तरुणाईच्या पराक्रमासोबतच समाजातील एकोप्याची भावना, शिस्तबद्ध आयोजन आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले” असे खरदार संजय पाटील यावेळी माध्यमामंशी बोलताना आपले भावना व्यक्त केली. खासदार पाटील यावेळी बाळ […]Read More

सांस्कृतिक

शून्य अपघातात संपन्न संस्कृतीची दहीहंडी २०२५!

*मीरा-भाईंदर दि १७:– प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि वंदना विकास पाटील जनहित संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृतीची दहीहंडी २०२५ हा भव्य सोहळा यंदा मीरा-भाईंदरमध्ये उत्साहात पार पडला. दरवर्षी ठाण्यात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा पारंपरिक उपक्रम, *परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक* यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच मीरा-भाईंदरमध्ये पार पडला. कार्यक्रमात संपूर्ण दिवसभर १०० हून अधिक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

10 मीटर एअर रायफल स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण पदक

पुणे, दि १७: श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू असलेल्या एजीसी स्पोर्टस  पॅरा एडिशन २०२५ मध्ये रविवारी झालेल्या पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग (SH1) स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीने सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच या स्पर्धेत कर्नाटकाच्या राकेश एन. निदागुंडी याने रौप्य पदक तर कर्नाटकाच्याच सचिन सिद्दन्नावर याने कांस्य पदक पटकावले. विशेष म्हणजे शेवटच्या […]Read More

गॅलरी

हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची निवड

पुणे, दि १७: हिंदू समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि संघटनबांधणीसाठी अखंड कार्यरत असलेल्या हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे कोहिनूर, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त […]Read More