Month: August 2025

सांस्कृतिक

राज्यमहोत्सव असणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई, दि १९:–यंदा पासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह मंत्री गणांच्या उपस्थितीत करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्य, स्पर्धा, रोषणाईसह; व्याख्याने, लोककलांच्या अविष्काराच्या भरगच्च कार्यक्रमांसाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या वर्षी थेट शासनाच्या सहभागातून गणेशोत्सव राष्ट्रीय आणि […]Read More

राजकीय

मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

मुंबई, दि १९,मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. मुंबईतील मिठी नदीची आणि नदी काठच्या परिसराचा आढावा घेतला तसेच विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण परिसराची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी आपत्ती […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे भरपावसात धरणे आंदोलन

पुणे, दि १९: राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली ९० हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत, यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉटमिक्स असोसिएशन, राज्य मजूर सहकारी संस्था, पुणे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पहिल्या ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ स्पर्धांचा दिमाखदार समारोप

पुणे, दि १९: श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे ११ ते १८ ऑगस्ट २०१५ दरम्यान झालेल्या पहिल्या ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ मध्ये भारतातील पॅरा नेमबाजांनी दमदार कामगिरी केली. भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलोत्सव […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार दि. १९ ऑगस्ट, २०२५.• मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ.(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग) • कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देणार. (महसूल, नोंदणी […]Read More

खान्देश

हतनूर धरणातील पाण्याचा विसर्ग, तापीची पातळी वाढली

नंदुरबार दि १९:– हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे तापी नदीची पातळी वाढली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. प्रशासनाने तापी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे. हतनूर धरणातून आज दुपारी १२ वाजता १,५७,३९९ क्यूसेक पाणी सोडण्यात आलं आहे. येत्या काही […]Read More

विदर्भ

प्रमुख नद्यांना पूर – हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वाशीम दि १९:– वाशीम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील चार दिवसांपासून प्रमुख नद्या आणि नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकं वाहून गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील सर्व ४५ महसूल मंडळात मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यापैकी ११ महसूल मंडळात तीनपेक्षा जास्त […]Read More

महानगर

*असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी ; ज्येष्ठ राजकीय

मुंबई, दि १९ :असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, जे कामगार आहेत त्यांचा उत्कर्ष कसा होईल, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य कसे येईल, त्यांना आनंदाने कसे जगता येईल, यासाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी कामगार नेत्यांना सल्ला दिला. दिपकभाऊ काळींगण यांच्या नेतृत्वाखालील ऑल […]Read More

महानगर

पावसाचा वाढता जोर पाहता, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क

मुंबई, दि १९ : गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री श्री. मंगलप्रभात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

तुफानी पावसात भरकटलेले हेलिकॉप्टर रस्त्यावर उतरले

पुणे दि १९– लोणावळ्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावरच्या सालतर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे.सालतर गावच्या मागील बाजूला मंदिराकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे त्यावर उतरविण्यात आले.बाजूलाच मुळशी धरणाचा जलाशय तर दुसऱ्या बाजूला जग प्रसिद्ध ॲम्बी व्हँलीचा प्रकल्प आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलेट, चार प्रवासी होते.स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हे […]Read More