Month: August 2025

अर्थ

SBI चे गृहकर्ज महागले

मुंबई,दि. १९ : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने नवीन ग्राहकांसाठी गृहकर्जाचे दर ०.२५ टक्क्याने वाढवले आहेत. बँकेने व्याजदराची कमाल मर्यादा ८.४५ वरून ८.७० केली आहे. आता बँकेचे गृहकर्जावरील व्याज ७.५० टक्क्यांवरून ८.७० टक्के झाले आहे. व्याजदरातील हा बदल विशेषतः त्या ग्राहकांना प्रभावित करेल ज्यांचा क्रेडिट स्कोअर […]Read More

मनोरंजन

४६ वर्षांनंतर रजनीकांत आणि कमल हासन पुन्हा एकत्र

कमल हासन आणि रजनीकांत एका नवीन अॅक्शन चित्रपटासाठी चर्चेत आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीतील हे दोन मोठे स्टार जवळजवळ ४६ वर्षांनी पुन्हा एकत्र दिसतील. यापूर्वी दोघेही १९७९ मध्ये आलेल्या ‘रा अलाउद्दीनम अलाभुथा विलाक्कम’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. लोकेश कनागराजचा हा आगामी चित्रपट राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. तथापि, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली […]Read More

ट्रेण्डिंग

BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट

मुंबई,दि. १९ : रिलायन्स जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आता एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे जी तुम्हालाही आवडेल. कंपनी मान्सून धमाका ऑफर अंतर्गत मर्यादित काळासाठी वापरकर्त्यांना मोफत ब्रॉडबँड कनेक्शन देत आहे. या ऑफर अंतर्गत फायबर ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध आहे, या ऑफरचा लाभ घेतला तर कंपनी तुम्हाला इंस्टॉलेशनच्या दिवसापासून […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात सापडला सोन्याचा मोठा साठा

भुवनेश्वर, दि. १९ : ओडिशातील देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या ठिकाणी सोन्याचे साठे आढळले आहेत. तसेच मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध येथे सोन्याचे साठे शोधण्याचे काम सुरु आहेत. या खाणींचा भारताला मोठा फायदा होणार आहे. 2020 पर्यंत देशात दरवर्षी फक्त 1.6 टन सोन्याचे उत्पादन होत होते. आता ओडिशामध्ये सापडलेले सोन्याचे साठ्यामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

Cambridge Dictionary मध्ये ६ हजार नवीन शब्दांचा समावेश

लंडन,दि. १९ : अलीकडेच केंब्रिज डिक्शनरीने तब्बल ६,००० नवीन शब्द, वाक्यप्रचार आणि संज्ञा आपल्या शब्दसंग्रहात समाविष्ट करून इंग्रजी भाषेच्या सतत बदलणाऱ्या स्वरूपाला मान्यता दिली आहे. ही भर म्हणजे केवळ भाषिक समृद्धी नव्हे, तर आधुनिक समाजातील संवाद, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक प्रवाहांचे प्रतिबिंबही आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि तरुण पिढीच्या संवादशैलीमुळे अनेक नविन शब्द जन्म घेत आहेत, […]Read More

राजकीय

निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

नवी दिल्ली,दि. १९ : देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपतीपदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून त्यांनी २००७ ते २०११ या कालावधीत न्यायदानाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निष्पक्ष आणि संविधाननिष्ठ भूमिकेमुळे त्यांना न्यायव्यवस्थेत विशेष मान्यता मिळाली आहे. आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेल्या रेड्डी यांनी […]Read More

महानगर

मुंबईतील धोकादायक पगडी इमारतीचा पुनर्विकास करावा

मुंबई, दि १९मुंबईतील १४/१६ चुनावाला बिल्डिंग, प्रभु गल्ली, चिरा बाजार या पगडी इमारतीच्या कोसळामुळे १७ कुटुंबे – ७० पेक्षा अधिक भाडेकरू एका रात्रीत रस्त्यावर आले आहेत. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक जोरदार पावसात, छप्पराविना रस्त्यावर अडकले आहेत. पगडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे म्हणतात, “ही दुर्घटना अपघात नाही; ही म्हाडाच्या दीर्घकाळच्या दुर्लक्षाची थेट […]Read More

राजकीय

२०२७ च्या जनगणनेवेळी अनाथ मुलांच्या सर्वेक्षणाची सुद्धा तरतूद करा

*नवी दिल्ली दि १९:–देशातील अनाथ मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याने शिक्षण हक्क कायद्यानुसार या मुलांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी २०२७ रोजी जनगणना करताना अनाथ मुलांसाठी एक विशेष कॉलमची सोय करावी अशी मागणी २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत मुद्दा मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. भारतामध्ये अनाथ मुलांची […]Read More

राजकीय

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या

मुंबई, दि. १९ : – गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू, या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, […]Read More

आरोग्य

रायगडमधील कर्करोग रुग्णालयाला मुद्रांक शुल्क माफ

मुंबई दि. १९: — महाराष्ट्रात आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्य सरकारच्या महसूल विभागाने टाटा मेमोरिअल सेंटरच्या प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. या प्रकल्पासाठी १० हेक्टर (४० एकर) शासकीय जमीन ३० […]Read More