Month: August 2025

महानगर

गणपती विसर्जनपूर्वी वरळी येथील लोटस जेट्टीची केली युवासेनेने पाहणी

मुंबई, दि २१वरळीतील लोटस जेट्टी येथे गणपती विसर्जन दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही या संदर्भात शिवसेना उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी अभिजित पाटील यांनी मुंबई महापालिका जी दक्षिण विभागाचे सहाय्यक अभियंता राजेश यादव, कनिष्ठ अभियंता शिव प्रसाद कोपर्डे यांच्या सोबत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी अनेक मार्गदर्शक सूचना तसेच नागरिकांच्या सूचना देखील या ठिकाणी […]Read More

शिक्षण

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

मुंबई, दि. २१ :– अंधत्वमुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन, वनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या १८०० शाळांमधील […]Read More

विदर्भ

सावंगी तलाव फुटला, हजारों हेक्टर शेतजमीनपाण्याखाली…

चंद्रपूर दि २१:– संततधार पावसामुळे नागभिड तालुक्यातील सावंगी बडगे तलाव फुटल्याने हजारों हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून धान पिकाचे व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लघू पाटबंधारे विभाग, पंचायत समिती अतंर्गत सावंगी बडगे येथील तलावांचे तुरुम बांधकाम करण्यांत आले. कंत्राटदारांचे हलगर्जीपणामुळे सदर बांधकाम जून महिन्या पर्यंत सुरू होते. गेले दोन दिवस नागभिड तालुक्यात संततधार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे निखळपणे पाहण्याचा अभाव : प्रा. मिलिंद जोशी

पुणे, दि २१: स्त्री-पुरुष मैत्रभावाचा संबंध कायम लैंगिकतेशीच निगडीत असतो असे नाही. स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे निखळपणे पाहण्याची निकोप मानसिकता प्रगत समाजातही अभावानेच दिसते. आपल्या जवळची माणसे आपल्याला न उमजणे ही जीवनाची शोकांतिका आहे. अमृता प्रीतम व इमरोज यांच्यातील नात्याने रक्ताच्या नात्यापलिकडच्या सर्जनासाठीच्या प्रेरणांना जन्म दिला. संजीवक शक्ती बनून जगण्याच्या लढाईतली उमेद वाढवली, असे मत अखिल भारतीय […]Read More

विदर्भ

बोकड बाजार फुलले गर्दीने

चंद्रपूर दि २१:- चंद्रपूर जिल्ह्यातील टेमुर्डा इथे आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मोठा बोकड बाजार भरलाय. विदर्भातील सर्वात मोठा असलेला हा बाजार आज लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. टेमुर्डा हे गाव वरोरा तालुक्यात असून, इथे दर गुरुवारी हा बाजार भरतो. या बाजारात राज्य आणि तेलंगणातून बोकड विक्रीसाठी आणले जातात. नुकताच श्रावण महिना संपला आणि 23 तारखेला पाडवा […]Read More

मराठवाडा

मांजरा धरण ९८ टक्के क्षमतेने भरले…

लातूर दि २१:– लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ९८ टक्के क्षमतेने भरले आहे. प्रकल्पाचे दोन दरवाजे आज सकाळी ०.२५ मीटरने उघडले. सद्यस्थितीत प्रकल्पाच्या चार दरवाज्यातून ३४९४.२८ क्युसेक्स इतका मांजरा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प धरण ९८ […]Read More

Uncategorized

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले

छ. संभाजी नगर दि २१– जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा पाणीसाठी 95 टक्क्यावर पहोचल्याने आज सकाळी जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे, धरणाचे 18 दरवाजे अध्या फुटा पर्यंत उघडण्यात आले आहेत.एकूण 9 हजार 432 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे अशी माहिती साह्यक अभियंता मंगेश सेलार यांनी दिली. सकाळी 7 वाजता पाणी सोडण्यात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, 564 लोकांचे स्थलांतर

सांगली दि २१– सततच्या पावसामुळे तसेच कोयना धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आता पर्यंत सांगलीतील 113 कुटुंबातील 564 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मिरज येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. तसेच कुरणे मळ्याकडे जाणाऱ्या […]Read More

देश विदेश

आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय जोडीला कांस्य पदक

कझाकस्तानच्या श्यामकेंट शहरात सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरी आणि सुरुची इंदर सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या जोडीने चिनी तैपेई संघाला १७-९ असे पराभूत करून ही कामगिरी केली. मंगळवारी याआधी, भारताची स्टार नेमबाज आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये […]Read More

देश विदेश

हवाई दलात दाखल होणार तब्बल 62 हजार कोटींची अत्याधुनिक विमाने

भारतीय संरक्षण क्षेत्राच्या सज्जतेसाठी सरकार मोठी पावले उचलत आहे. स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उत्पादनांना प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय हवाई दलाला (IAF)62000 कोटी रुपयांच्या 97 एलसीए तेजस मार्क 1ए लढाऊ विमाने खरेदीला मंजूरी देण्यात आली आहे. या अपडेटनंतर बुधवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) सारख्या संरक्षण कंपन्यांच्या […]Read More