धाराशिव, दि. २५ : दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपींवर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल 306 अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी […]Read More
शिर्डी, दि. २५ : अहिल्यानगर येथील जगप्रसिद्ध शिर्डी येथील साई बाबांच्या दरबारात भाविकांची मोठी गर्दी असते. साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना लांब रांगेतून जावे लागते, अशा परिस्थितीत साई संस्थेने या भक्तांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. साई मंदिरात ब्रेक दर्शन सुरू होणार आहे, ज्यामुळे सामान्य दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना फायदा होईल. साई बाबा संस्थेने […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार आहे. या संदर्भातील निर्णय आज (२५ जून) सीबीएसई घेतला आहे. त्यामुळे २०२६ पासून दहावीचे विद्यार्थी वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देऊ शकणार आहेत. […]Read More
मुंबई, दि. २५ : दरवर्षींपेक्षा १५ दिवस आधीच दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. आता काहीशा उशीराने पेरण्या पार पडल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी या अतिशय महत्त्वाच्या खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील विविध भागधारकांनी आज ही बाब स्पष्ट करत सरकारकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. राज्यातील […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 अंतर्गत वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब ) याला मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प टप्पा -1 मधील विद्यमान वनाझ – रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार असतील. हे दोन उन्नत कॉरिडॉर 12.75 किमी लांबीचे […]Read More
मुंबई, दि. २५ : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कागदाचा वापर न करता पेपरलेस ई कॅबिनेटची पहिली बैठक काल (दि. २४) पार पडली. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक राज्यांनी यापूर्वी ई कॅबिनेट घेतले असून ई कॅबिनेट घेणारे महाराष्ट्र पाचवे राज्य ठरले आहे. ई कॅबिनेट मधील सरकारच्या निर्णयाची माहिती मंत्र्यांनाच पाहता येणार आहे. सचिव, खासगी सचिव, ओएसडी किंवा […]Read More
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापूरी चप्पल सारखी चप्पल एका आंतरराष्ट्रीय ब्रँड ने तयार केल्याने सोशल मिडियावर वादाला तोंड फुटले आहे. कोल्हारी चप्पलची डिझाईन नक्कल केल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.इटलीच्या लग्जरी फॅशन ब्रँड प्राडा (Prada) च्या नविन कलेक्शनमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. प्राडाने अलीकडेच मिलान (Milan) मध्ये आपले Men’s Spring/Summer […]Read More
मुंबई, दि. २५ : शिक्षण क्षेत्र आणि उद्योग जगतातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने ‘ ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ‘ने (एआयसीटीई) ‘एआयसीटीई इंडस्ट्री फेलोशिप योजने’ची घोषणा केली आहे. ही योजना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापकांसाठी आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात तीनशे शिक्षकांची निवड केली जाणार आहे. ‘एआयसीटीई’ मार्फत यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, […]Read More
मुंबई, दि. २५ : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले, वरील तथ्यांच्या प्रकाशात, आम्हाला शंका नाही की ही याचिका फेटाळली पाहिजे. त्यानुसार ती फेटाळली […]Read More
पनवेल, दि २५पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे 30 जून पासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.पनवेल महापालिकाक्षेत्रामधील नाट्यकलावंतांना अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या […]Read More