Month: June 2025

महानगर

स्थानिकांचा विरोध डावलून कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीच्या घशात –

मुंबई, दि 4धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा सरकार मुंबईतील मोक्याचा जागा अदानीच्या घशात घालत आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीला देण्यास स्थानिक लोकांचा विरोध आहे. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत करायचे आहे तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनी अदानीला का दिल्या जात आहेत असा संतप्त सवाल करून मदर डेअरीची जागा अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा व […]Read More

देश विदेश

आजपासून हज यात्रेला सुरुवात

सौदी अरेबियामध्ये आजपासून हज यात्रा सुरू होणार आहे. रविवारपर्यंत १४ लाख नोंदणीकृत यात्रेकरू मक्का येथे पोहोचले आहेत, तर लाखो लोक अद्याप येणे बाकी आहे. ही यात्रा इस्लामिक कॅलेंडरच्या १२ व्या महिन्यात (२०२५ मध्ये ४-९ जून) जिल-हिज्जाच्या ८ ते १२ तारखेदरम्यान होते. हज दरम्यान, मुस्लिम काबा (बैतुल्लाह) ची प्रदक्षिणा घालतात आणि अल्लाहची प्रार्थना करण्यात वेळ घालवतात. […]Read More

देश विदेश

डिकॅथलॉन इंडियाची आघाडी: स्पोर्ट्स रिटेलमध्ये चक्रीयता मूलभूत बिझनेसमध्ये आणणारी पहिली

पुणे, दि 4जागतिक स्तरावरील आघाडीच्या मल्टी-स्पेशालिस्ट स्पोर्ट्स ब्रँड डिकॅथलॉनने आज भारतात त्यांचे चक्रीय व्यवसाय मॉडेल (सर्क्युलर बिझनेस मॉडेल) आणण्याची घोषणा केली. त्यामुळे शाश्वतता, कचरा कमी करणे आणि पुनरुत्पादक व्यवसायासाठीची त्यांची जागतिक वचनबद्धता अधोरेखित झाली. दुरुस्ती, पुनर्खरेदी, पुनर्विक्री आणि डीआयवाय स्पेअर्स यासारख्या चक्रीय मॉडेल्सद्वारे डिकॅथलॉन २०२७ पर्यंत आपल्या चक्रीय उलाढालीत तिप्पट वाढ करेल. ही वाढ २०२४ […]Read More

राजकीय

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली, दि. ४ : केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केले की संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि “ऑपरेशन सिंदूर” यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. २१ जुलै २०२५ रोजी संसद अधिवेशन सुरू होईल, आणि १२ ऑगस्ट २०२५ रोजी […]Read More

देश विदेश

स्टील-अ‍ॅल्युमिनियमवर अमेरिकेत 50% कर, भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम

वॉशिग्टन डीसी, दि. ४ : ट्रम्प सरकारने स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमच्या आयातीवर ५०% कर लागू केला आहे. मात्र त्यांनी या टॅरिफमधून ब्रिटनला वगळले आहे. त्यावर पूर्वीप्रमाणेच २५% टॅरिफ लागू असेल, कारण अमेरिका आणि ब्रिटनमध्ये व्यापार करारावर आधीच वाटाघाटी सुरू आहेत. ३० मे रोजी, ट्रम्प यांनी १९६२ च्या यूएस ट्रेड एक्सपान्शन अ‍ॅक्टच्या कलम २३२ अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षेच्या […]Read More

कोकण

परशुराम घाटातील नव्याने बांधलेल्या गॅबियन वॉलचा भाग कोसळला…

रत्नागिरी दि ४:– गतवर्षी मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात वारंवार दरड कोसळण्याचे सत्र सुरू होते. परिणामी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक परशुराम घाटामध्ये विस्कळीत झाली होती. काँक्रिटची संरक्षण भिंत फोल ठरल्यानंतर दरडीचा धोका टाळण्यासाठी याठिकाणी गॅबियन वॉल उभारण्यात आली. मात्र मान्सूनच्या सुरवातीलाच गॅबियन वॉल देखील कोसळू लागल्याने परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याचे बोलले जात आहे.Read More

विदर्भ

कौडीण्यपूर येथील रुख्मिणी मातेच्या पालखीचे जंगी स्वागत….

अमरावती दि ४– महाराष्ट्रातील 431 वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुख्मिणीचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौडीण्यपूर येथील माता रुख्मिणीची पालखी आषाढी एकादशी करिता पंढरपूरकडे काल सायंकाळी मार्गस्थ झाली.यावेळी माता रुक्मिणीच्या पालखीचे अमरावती शहरात चार दिवसानंतर आगमन झाले. अमरावती शहरातील बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या […]Read More

राजकीय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ सर्वांना देण्याची चूक झाली

पुणे प्रतिनिधी– ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू करतांना निकष पडताळण्यासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने सरकारी नोकरी असलेल्या, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांहून अधिक असलेल्या, तसेच घरी चारचाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. सर्वांना लाभ देण्याची चूक झाली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सिंचननगरमध्ये आयोजित केलेल्या ‘पुणे कृषी हॅकेथॉन’च्या उद्घाटनानंतर ते […]Read More

गॅलरी

*’जे दुसऱ्यांना चांगले म्हणतात, ते स्वतः चांगले असतात’—

पुणे, दि 4- पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधूताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित ‘सन्मती बाल निकेतन’, मांजरी (बु.), पुणे येथे विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘झेप’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेविका आणि एकलव्य न्यासाच्या अध्यक्षा मा. रेणुताई गावस्कर, रयत शिक्षण […]Read More

ट्रेण्डिंग

दिव्यांग वारकऱ्यांचा निघाला पंढरपूरला पायी पालखी सोहळा…

वाशीम दि ४:– आषाढी एकादशी म्हटलं की वेध लागतात वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे, हजारो नाहीतर लाखो वारकरी पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत टाळ मृदंगाच्या निनादात पंढरपुरात दाखल होत असतात, यंदा पहिल्यांदाच वाशीम येथील दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत. १५ दिव्यांग वारकरी ३५ दिवसात ४०० किलोमीटर […]Read More