Month: June 2025

शिक्षण

NEET-JEE च्या काठीण्यपातळीची होणार पडताळणी

मेडिकल, इंजिनिअरिंग आणि महाविद्यालय प्रवेशासाठी नीट, जेईई आणि सीयूईटीची (यूजी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी. या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी गरजेपेक्षा जास्त कठीण तर नाहीत ना, याची पडताळणी शिक्षण मंत्रालय करत आहे. मंत्रालयाची उच्च अधिकार समिती ४ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे मानसशास्त्रीय विश्लेषण करणार आहे. सोबतच या प्रश्नपत्रिका सीबीएसईसह सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी किती अनुकूल आहेत, हेही पाहिले जाणार आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

डोंबिवलीतील हायप्रोफाईल सोसायटीत सापडले २ कोटींचे ड्रग

डोंबिवलीतील हायप्रोफाईल लोढा पलावा सोसायटीत छापा टाकून 2 कोटी 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. कल्याण परिमंडळ-3 च्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केलीय. त्यामध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. कल्याण डोबिवलीत नशेखोरांच्या विरोधात कल्याण पोलिस परिमंडळ तीन चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मोठी मोहिम हाती घेतली आहे. […]Read More

क्रीडा

भारत करणार 2029 च्या World Police and Fire Games चे

नवी दिल्ली: (२७ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी २०२९ च्या प्रतिष्ठित जागतिक पोलिस आणि अग्निशमन खेळांसाठी भारताला यजमान देश म्हणून नियुक्त करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि हा प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. त्यांनी असेही म्हटले की, ५० हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा करण्यासाठी पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती सेवांना एकत्र आणणाऱ्या या […]Read More

ट्रेण्डिंग

रिलायन्सचे ‘कॅम्पा कोला’ कोल्ड्रिंक सापडले वादात

मुंबई, दि. २७ : रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय बाजारात पुन्हा लाँच केलेला ‘कॅम्पा कोला’हा सॉफ्ट ड्रिंक ब्रँड सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका जाहिरातीमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या प्रतिमेचा वापर केल्याने सोशल मीडियावर #BoycottCampa हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अनेकांनी कंपनीवर टीकेची झोड उठवली आहे. एका पोस्टरमध्ये मंदिरासोबतच कॅम्पा कोलाची बॉटल […]Read More

राजकीय

*सुरेशचंद्र राजहंस मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते

मुंबई, दि २७मुंबई विभागीय काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेशचंद्र राजहंस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले देऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. सुरेशचंद्र राजहंस यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात प्रवक्ते, मुंबई काँग्रेसच्या स्लम सेल विभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते यासारख्या महत्वाच्या पदावर काम केले आहे. लोकसभा […]Read More

महानगर

प्रगतीशील पनवेल भव्य -दिव्य लघूपट स्पर्धा, 3.75 लाख रूपयांची पारितोषिके

पनवेल.दि २७:– पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या संकल्पनेतून ‘प्रगतीशील पनवेल’ ही भव्य दिव्य अशी लघूपट स्पर्धा ( शॉर्ट फिल्म) महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात आली आहे. चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसनशील विकासात्मक प्रगतीशील अशी पनवेल महानगरपालिकेची वाटचाल सुरू आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासुन पनवेल महानगरपालिका आपल्या दशकपूर्ती वर्षात पदार्पण करीत आहे. मनपाचा गत नऊ वर्षांच्या कालावधीत […]Read More

महानगर

महापालिका इ विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे झाले सादरीकरण

मुंबई,दि २७बृहन्मुंबई महानगरपालिका ई” विभाग कार्यालयांचे पुनर्बांधणी होणार असून त्याजागी आयकॉन इमारत कार्यालय म्हणून उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याचे इ वॉर्ड महापालिका कार्यालय हे आता माझगाव म्हाडा कॉलनी, घोडपदेव येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे. ई वॉर्ड येथे पुनर्बांधणी होत असलेल्या आयकॉन इमारतीच्या वास्तुचे महानगरपालिका आयुक्त श्री.भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहरे) सौ.अश्विनी जोशी यांनी केलेल्या सुचनेनुसार […]Read More

महानगर

पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन धोरण …

मुंबई, दि. २७ :प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, बृहन्मुंबई महापालिका […]Read More

महानगर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा जीवनगौरव पुरस्कारमधुकर भावे यांना

मुंबई दि २७:– अखिल भारतीय मराठी परिषदेच्यावतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण 2 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मेंढ्यांच रिंगण पडलं पार……

पुणे दि २७– श्रीसंत तुकोबाराय यांच्या पालखीला मेंढ्यांचं अनोखं रिंगण घातलं जातं. दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत आगमनझाल्यावर पालखीला मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं.आज देखील काटेवाडी येथे हा रिंगण सोहळा पार पडला.यामध्ये माने केसकर महानवर, काळे, मासाळ यांच्या मेंढ्यांना हा मान असतो. काही वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीत आगमन झालं होतं. त्यावेळेसकाटेवाडी आणि आसपासच्या […]Read More