मुंबई, दि. १० : मुंब्रा येथे घडलेली कालची घटना अतिशय गंभीर आहे. काही माध्यमांनी यासंदर्भात रेल्वे मंत्री संवेदनशील नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी कालच माझ्याशी पाऊण तास चर्चा केली आहे. यातल्या अडचणी आणि उपाययोजना त्यांनी मला सांगितल्या आहेत. यावर उपाय करण्यासाठी सर्व लोकल या भाडेवाढ न करता एसी करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचा दावा […]Read More
मुंबई, दि 10 :कला कोणतीही असो,नृत्य,अभिनय किंवा गायकी, तिच्याशी कामगार कल्याण मंडळाचे नेहमीच अतुट नाते राहिले आहे. लोकमानसातून निर्माण झालेल्या शाहिरी लोककलेचे सातत्य असेच टिकून राहिले तर तिला निश्चितच उज्वल भवितव्य आहे,असा विश्वास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी येथे लोककलेचे प्रणेते स्व.मधुशेठ नेराळे यांच्या जन्मदिनी बोलताना व्यक्त केला.त्यांच्याच हस्ते भव्य शाहिरी […]Read More
गडचिरोली,दि. १० : गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या वाढीला पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. याकरिता खाण परिसरातील ९०० हेक्टर जंगलावरील तब्बल १ लाख झाडे तोडण्याला देखील वन्यजीव संरक्षणाच्या अटीसह परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे ९३७ हेक्टर वनजमीन खाणकामासाठी वापरण्यात येणार असून या अंतर्गत येणाऱ्या १.२३ लाख झाडांची कत्तल होणार आहे. त्याचबरोबर या भागातील टायगर […]Read More
मुंबई दि १०– महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे.सामाजिक न्यायाचे तत्त्व प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात २००५ मध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. केंद्र शासनामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित […]Read More
मुंबई दि १०– राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या विभागाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या गटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी इतर राज्यातील राबविण्यात येत असलेल्या चांगल्या पध्दतींचा, धोरणात्मक बाबींचा अभ्यास […]Read More
मुंबई, दि. १० :– आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन […]Read More
मुंबई दि १०– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असून देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी […]Read More
पुणे / लोणावळा : यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतिशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले. लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे […]Read More
मंगळवार, दि. 10 जून 2025• महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा. आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणणार (सामाजिक न्याय विभाग)• राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250 रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 ची वाढ, तर बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार 8,000 विद्यावेतन (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)• राज्य उत्पादन शुल्क […]Read More
मुंबई, दि. १० : जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र आता एका क्लिकवर मिळणार आहे. ही सर्व प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली असून येत्या महिन्याभरात ही प्रणाली कार्यन्वित होणार आहे. राज्य सरकारने बार्टी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि टाटा […]Read More