Month: June 2025

महानगर

पवई तलाव भरुन वाहू लागला !

मुंबई दि १८– बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक १८ जून २०२५) पहाटे ६ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. […]Read More

राजकीय

पंढरपूरला जाणाऱ्या दिड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान

मुंबई दि १८:- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीतील १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यातील गतवर्षी नोंदणी केलेल्या ९०२ दिंड्याच्या खात्यात हा निधी आज वितरित करण्यात आला आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या दिंड्याना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेण्यात आला […]Read More

ऍग्रो

लिंबाच्या दरात मोठी घसरण

जालना दि १८– जालन्याच्या उटवद येथे लिंबाच्या दरात मोठी घसरण झाली असून मे महिन्यात 100 रुपये प्रतिकिलोने विकले जाणारे लिंबू आता 15 रुपये प्रति किलोने विकले जात असल्याने लिंबू उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. बाजारात लिंबाची आवक कमी असल्याने मे महिन्यात 100 रुपये प्रतिकिलोने लिंबू विक्री होत होती. मात्र, जून महिन्यात बाजारात लिंबूची आवक वाढलेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईकरांना मिळणार वॉटर मेट्रोची सुविधा

मुंबई, दि. १७ : मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून लवकरच वॉटर मेट्रोचा पर्याय दिला जाणार आहे. दरम्यान वॉटर मेट्रोचा आराखडा तीन महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईत वाहतूक कोंडीला पर्याय वॉटर मेट्रो सुरू होईल अशी नागरिकांना आशा आहे. मुंबई वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पाहणीचे काम कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीला देण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

आज दिवसभरात Air India ची सात उड्डाणे रद्द

मुंबई: मंगळवारी Air India ने सात उड्डाणे रद्द केल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही रद्द झालेली उड्डाणे तांत्रिक अडचणी, विमान उपलब्धतेच्या समस्या आणि सुरक्षेच्या अतिरिक्त तपासण्यांमुळे प्रभावित झाली आहेत. रद्द झालेल्या उड्डाणांची यादी Air India ने खालील उड्डाणे अचानक रद्द केली:🔹 दिल्ली – पॅरिस (AI-143)🔹 अहमदाबाद – लंडन गॅटविक (AI-159)🔹 दिल्ली – […]Read More

राजकीय

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचे मानधन दुप्पट

मुंबई, दि. १७ : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील देशांतर्गत संघर्षमय कालावधी म्हणजे आणीबाणी. तत्कालिन पंतप्रधान यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीमुळे हजारो लोकांना तुरुंगवासात जावे लागले होते. देशात सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या (Emergency) कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच मानधनधारकाच्या हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा आणि अन्य काही अटी शिथिल […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात राम आणि श्याम यांचा शुभविवाह

पुणे, दि. १७ : पुण्यात श्रीराम श्रीधर आणि श्याम कोन्नूर यांचा समलैंगिक विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. ‘मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशन’चे सह-संस्थापक श्याम आणि राम हे जोडपे विवाहबद्ध झाले. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या या भव्य विवाहसोहळ्यात पारंपरिक हिंदू आणि ख्रिश्चन विधी, ढोल-ताशांचा गजर, आणि समुदायाचा जिव्हाळा यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले. तीन दिवस चाललेल्या या विवाह […]Read More

ट्रेण्डिंग

ऑनलाइन बेटिंग प्रकरणी ED कडून हरभजन, युवराज, रैनाची चौकशी

नवी दिल्ली, दि. १७ : देशभर चर्चेत असलेल्या ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ED) मोठी कारवाई करत माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांची चौकशी केली. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेते सोनू सूद आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचीही चौकशी करण्यात आली. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार वन बेट, फेअर प्ले आणि महादेव ऑनलाइन बेटिंग […]Read More

ऍग्रो

महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर

मुंबई दि १७– राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) […]Read More

गॅलरी

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत;सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड

मुंबई, दि १७- जागतिक संगीत दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा आज सांस्कृती कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. २१ जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे […]Read More