Month: June 2025

ट्रेण्डिंग

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

मुंबई, दि. २० :– कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. […]Read More

गॅलरी

पृथ्वी आणि ‘पिंची’ संस्थांचा स्तुत्य उपक्रम : वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात

पुणे प्रतिनिधी- संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहूतून प्रस्थान करून १९ जून रोजी पिंपरीतील भक्ती-शक्ती चौकात आगमन करणार आहे. विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भक्तिभावाने या पवित्र वारीत सहभागी होतात. मात्र, या भक्तिमय उत्सवाच्या समाप्तीनंतर मागे राहातो तो कचरा आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था, नागरिक आणि हॉटेल्स अन्न-पाण्याची सेवा करत […]Read More

गॅलरी

रा.स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना

मुंबई दि २०– रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांचे संघटन आहे हा हेतूपुरस्सर पसरवलेला गैरसमज आपल्या पुस्तकातून दूर करताना संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती रमेश पतंगे यांनी आपल्या पुस्तकातून अधोरेखित केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. लेखक व विचारवंत रमेश पतंगे लिखित ‘व्हाय आर वी इन द आरएसएस?…. ‘ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन […]Read More

राजकीय

बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडवणारकामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई दि २०भाजपा बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस, भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन नागे यांनी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुडंकर यांच्यासोबत बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी, बेस्ट कामगारांच्या पुढील येणाऱ्या काळात सुरक्षित भविष्यासाठी नुकतीच मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनात मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये कामगार सचिव कुंदन मॅडम महानगरपालिकेचे सह आयुक्त, कामगार साह्यक आयुक्त सावरकर तसेच बेस्ट प्रशासनाचे […]Read More

महानगर

बीएमसीची धार्मिक स्थळांसाठी विशेष स्वच्छता मोहीम

मुंबई दि २०– बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत “विशेष स्वच्छता मोहीम : धार्मिक स्थळे” या उपक्रमाची सुरुवात २८ एप्रिल २०२५ पासून करण्यात आली होती. १५ दिवस चाललेल्या या उपक्रमाचा उद्देश धार्मिक व पूजास्थळांमध्ये स्वच्छतेचा दर्जा उंचावणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणे हा होता. मुंबईतील धार्मिक स्थळांना दररोज लाखो नागरिक भेट देतात. या स्थळांचे […]Read More

ट्रेण्डिंग

AIR India च्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट पतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली, दि. १९ : मुंबई: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर ७८७ विमानाच्या भीषण अपघातानंतर आता ड्रीमलायनर ७८७ च्या विश्वासार्हतेबद्दल विविध शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या मिनिटभरात अपघात झाला. त्यात २७४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर बोईंग कंपनीच्या ड्रीमलायनर ७८७ विमानाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. याबद्दल एअर इंडियात काम करणाऱ्या दोन […]Read More

ट्रेण्डिंग

या शेअर मार्केट तज्ज्ञांवर SEBI ने घातली बंदी

मुंबई, दि. १९ : शेअर मार्केट तज्ञ संजीव भसीन आणि इतर ११ जणांना SEBI ने शेअर बाजारातून बंदी घातली आहे. शेअर्समध्ये फेरफार करून नफा कमावल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सेबीने बंदी घालण्यापूर्वीच भसीन ज्योतिषी बनले होते. ललित भसीन, आशिष कपूर, राजीव कपूर, जगत सिंग, प्रवीण गुप्ता आणि त्यांची पत्नी बबिता गुप्ता या व्यक्ती […]Read More

शिक्षण

QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील ५४ विद्यापीठांचा समावेश

नवी दिल्ली,दि. १९ : भारतातील उच्च शिक्षण संस्थांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या वर्षी एकूण ५४ विद्यापीठे समाविष्ट आहेत, ज्यात १२ भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) समाविष्ट आहेत. आठ विद्यापीठांनी पदार्पण केले आहे. अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि चीन नंतर भारत आता चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेला देश आहे. या […]Read More

देश विदेश

अमेरिकेला पाठवला जाणार अपघातग्रस्त 787 Dreamliner चा ब्लॅक बॉक्स

अहमदाबाद, दि. १९ : १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी बचावला. या घटनेत एकूण २७० जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या दिवशी सापडला. या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. […]Read More

पर्यावरण

Farmer ID धारकांना मिळणार ही सुविधा मोफत

नवी दिल्ली,दि. १९ : केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आयडी (Farmer ID) च्या आधारे त्यांच्या क्षेत्रासाठी सुस्पष्ट हवामान माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे. भविष्यात या फार्मर आयडीचा वापर योजना लाभ, अनुदान, विमा, बाजारभाव, प्रशिक्षण इ. साठीही होणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रसंगी तांत्रिक मार्गदर्शन, पिकांच्या सल्ला, खतांची […]Read More