Month: June 2025

सांस्कृतिक

नामदेव महाराजांच्या दिंडीचे परभणी जिल्ह्यात आगमन

परभणी दि २१ — “श्री संत शिरोमणी नामदेवांनी भागवत धर्माची पताका लाविली” त्यांच्या भक्ती, कीर्तन, अभंग, आणि सामाजिक समतेचे कार्य करून भगवंताच्या प्रेमभक्तीचा झेंडा समाजात उभारला आणि सर्वसामान्य जनतेला तो मार्ग दाखवत महाराष्ट्रासह पंजाब पर्यंत भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नर्सी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत शिरोमणी […]Read More

सांस्कृतिक

पालख्यांच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांची गर्दी…

पुणे दि २१:- जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुण्यात काल आगमन झालं असून त्यांचा आज पुण्यात मुक्काम आहे. पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या हे मुक्कामाला असतात आज सकाळपासून मोठ्या संख्येने वारकरी तसेच पुणेकर नागरिक हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. शहरातील पेठ भागात […]Read More

ट्रेण्डिंग

सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरु करण्याबाबत विचार

मुंबई दि २१– योग हा भारताचा अमूर्त वारसा असून देशाचे जगाला योगदान आहे. देशाचा आर्थिक विकास होत असताना लोकांच्या जीवनातील ताणतणाव वाढत आहे. मन तणावमुक्त नसेल तर आरोग्य चांगले राहणार नाही. यास्तव सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरु करण्याबाबत कुलगुरुंशी विचारविनिमय करणार आहे असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केले. आंतरराष्ट्रीय […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पहिला गर्डर यशस्वीरित्या लाँच

पालघर: (२० जून) मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी पहिला ४० मीटर फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर महाराष्ट्रात यशस्वीरित्या लाँच करण्यात आला आहे, असे नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने शुक्रवारी सांगितले.९७० मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर देशातील बांधकाम क्षेत्रात वापरला जाणारा सर्वात वजनदार आहे, असे एनएचएसआरसीएलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. “या गर्डरचे लाँचिंग डहाणूमधील साखरे गावात […]Read More

महानगर

सहकार क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे, भविष्यातही राहील!

मुंबई दि २० — केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ‘सहकार से समृद्धि 2025’ या राष्ट्रीय परिसंवादाचे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, सहकार क्षेत्राचा 120 वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेली महाराष्ट्राची भूमी, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष […]Read More

राजकीय

NAFED लवकरच थेट शेतकऱ्यांकडून करणार खरेदी

मुंबई, दि. २० : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज घोषणा केली की, नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून थेट खरेदी सुरू करेल, ज्यामुळे कृषी उत्पादन प्रक्रियेतील मध्यस्थांना दूर केले जाईल. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी […]Read More

क्रीडा

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण

लंडन, दि. २० : यावर्षीपासून भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेस अँडरसन-तेंडुलकर असे नाव देण्यात आले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या योगदानाबद्दल इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) हा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. अखेर काल लॉर्ड्स येथेच तेंडुलकर व अँडरसनच्या उपस्थितीत या करंडकाचे अनावरण करण्यात आले. ईसीबीने त्यामुळे […]Read More

देश विदेश

मानवाधिकार आयोगाकडून आंध्रप्रदेश सरकारला नोटीस

नवी दिल्ली: (२० जून) : आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका गावात एका महिलेच्या पतीने कर्ज फेडले नाही म्हणून सावकाराने तिला झाडाला बांधून सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याच्या वृत्तांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने शुक्रवारी आंध्र प्रदेश सरकार आणि राज्य पोलिस प्रमुखांना नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) एका निवेदनात असे निरीक्षण नोंदवले आहे की माध्यमांमधील वृत्तातील मजकूर, जर […]Read More

राजकीय

लाडक्या बहिणींना मिळणार 9% व्याजदराने कर्ज

मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबई येथे शासकीय महामंडळांच्या महिलांसाठीच्या व्याजपरतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि विविध महामंडळांमार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही, […]Read More

राजकीय

राज्यातील किनारपट्टीच्या विकासासाठी एक सकारात्मात पाऊल

मुंबई, दि २०- महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्या. किनारपट्टीच्या विकासासाठी केंद्रीय आणि राज्य विभागाची एकत्रित बैठक ही एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले.राज्यातील बंदर विकास आणि महत्वाच्या प्रकल्पांविषयी केंद्रीय मंत्री […]Read More