Month: June 2025

सांस्कृतिक

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे बीड मध्ये आगमन

बीड दि २२– राज्यातील तिसऱ्या मानाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले.पैठणहून निघालेल्या या दिंडीचे जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ग्रामस्थानी स्वागत केले. हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने ही दिंडी मार्गस्थ होत आहे. शिरूर शहरामध्ये येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे फटाके आणि ढोल बँड वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पायघड्या […]Read More

राजकीय

भायखळा येथे लहानग्यांसाठी खेळाचे साहित्य वाटप.

मुंबई, दि २२शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि आमदार मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज खासदार निधीतून भायखळा विधानसभा मतदार संघातील शाखा क्रमांक २०७ मधील लक्ष्मी रेसिडेंसी येथे लहान मुलांच्या खेळांचे साहित्य बसविण्यात आले असून याचा लोकार्पण सोहळा पार पडला.लहान मुलांना खेळण्यासाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून आजपासून ही जागा खुली करून देण्यात आलेली आहे. एकीकडे मोबाईलच्या […]Read More

महिला

“महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर डॉ गोऱ्हेनी केली विजया रहाटकरांशी चर्चा”

मुंबई, दि. २२ :–महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट झाली.या सदिच्छा भेटीदरम्यान महिला चळवळीशी निगडित विविध सामाजिक, प्रशासकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली. डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषद उपसभापती […]Read More

राजकीय

खासदार पीयूष गोयल यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २२ : केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी भरवलेल्या जनता दरबारात रविवारी ९२ प्रकरणांचा निपटारा करण्यात याला. यात महापालिका, म्हाडा, गृहनिर्माण संस्थांपासून ते थेट पोलिस ठाण्यात दखल घेतली जात नसल्याच्या प्रकरणांचा समावेश होता.खासदार पीयूष गोयल हे कांदिवली येथील त्यांच्या लोककल्याण कार्यालयात नियमित जनता दरबार भरवून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित […]Read More

गॅलरी

सन्मती बाल निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

पुणे प्रतिनिधी : पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बाल निकेतन व तिर्थरूप शैक्षणिक वसतिगृह, मांजरी बु||, पुणे आणि मंगलम योग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माई सभागृहात ‘हीच अमुची प्रार्थना’ या […]Read More

मराठवाडा

पावसाळा सुरू झाला तरी धावताहेत 111 पाणी टँकर….

जालना दि २२:– जालना जिल्ह्यात भरपावसाळ्यात 111 पाणी टँकर धावत आहेत. जिल्ह्यात आज घडीला 111 टँकरद्वारे 70 गावे आणि 14 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील जालना आणि बदनापूर तालुक्यात सर्वाधिक टँकर धावत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीय. सध्या जालना तालुक्यात 38, तर बदनापूर तालुक्यात 40 पाणी टँकर सुरू आहेत. जालना तालुक्यातील […]Read More

महानगर

मुंबईतील नामांकित शाळेत वाटण्यात आली पंजाबी भाषेची पुस्तके

मुंबई, दि. २१ : केंद्र सरकारकडून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या भूमिकेबाबत राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आज मुंबईतील एका नामांकित शाळेत पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली आहेत. यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. पुस्तके परत घेण्याची मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी ‘आठवले’ घराण्याचा कवी

मुंबई, दि. २१ : मुंबईत रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात सात रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लिहिलेल्या कवितेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “तुम्हाला खरं सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही […]Read More

बिझनेस

इराण-इस्रायल युद्धाचा अदानींना फटका

मुंबई, दि. २१ : इराण-इस्रायल युद्धाचा गौतम अदानींवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या 10 दिवसांत त्यांची कंपनी Adani Ports चे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे अदानी यांच्या एकूण संपत्तीतही मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत अदानी यांच्या एकूण संपत्तीत 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे. गेल्या १० दिवसांत अदानी पोर्ट्स अँड […]Read More

देश विदेश

‘वेटिंग लिस्ट’ बाबत रेल्वेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, दि. २१ : रेल्वे बोर्डाने तिकीट यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी व प्रवाशांची गाडीतील गर्दी कमी करण्यासाठी नवीन निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठी ‘वेटिंग लिस्ट’ जारी होणार नाही. प्रत्येक गाडीत ‘वेटिंग लिस्ट’च्या तिकिटांच्या संख्येला कात्री लावण्यात येणार आहे. गाडीतील एकूण प्रवासी संख्येच्या २५ टक्केच अधिक ‘वेटिंग तिकिटे’ जारी करण्यात येतील. […]Read More