पुणे, दि २४ राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो […]Read More
मुंबई, दि.२४ :– पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मिती तर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत.या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार […]Read More
वाशीम दि २४:– वाशीमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आठ दिवसांपूर्वी कपाशी पेरणी केली होती. पाण्याची सोय करून दोन वेळा पाणी दिलं आणि पीक उगवू लागलं. पण आता वाणू कृमींचा कपाशीवर जबरदस्त प्रादुर्भाव दिसून येतं असून ही कीड कपाशीची कोवळी झाडं कुर्तडून नष्ट करताहेत. त्यामुळं शेतकऱ्यांवर नवे संकट आलंय. बेंबळा येथील शेतकरी संदीप काळेकर […]Read More
मुंबई दि २४– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात काल रात्री मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झाली.त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे […]Read More
पुणे दि २३:– माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या करणारी घटना आज सकाळी घडली माळीणजवळील पसारवाडी येथे डोंगरकड्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पसारवाडी गावाचा संपर्क तुटला आहे, दरड कोसळल्यामुळे डोंगरमाथ्यावरील मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.या गावातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून संभाव्य धोका लक्षात घेता पुनर्वसनाची मागणी केली होती. माळीण दुर्घटनेनंतर […]Read More
मुंबई, दि. २३ : मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता सुरक्षेच्या दृष्टीने मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु केले आहे. मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यास वेगाने सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 तर पश्चिम रेल्वेच्या 26 लोकलमध्ये 52 सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत होणार […]Read More
सांगली, दि. २३ : सांगलीच्या आटपाडी येथील नेलकरंजीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी मुलीला केलेल्या अमानुष मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे. साधना भोसले यांची मुलगी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. यासाठी खाजगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत […]Read More
मुंबई, दि. २३ : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा लादणाऱ्या सरकार विरुद्ध राज्यातील साहित्य आणि सामाजिक वर्तुळात असंतोष निर्माण झाला आहे. लेखक, साहित्यिक आणि भाषाप्रेमी विविध माध्यमांतून हिंदीसक्तीचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर कृतीशिल भूमिका घेत लेखक, कवी हेमंत दिवटे यांनी शासनाचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे, तर सचिन गोस्वामी आणि […]Read More
तेहरान : इराण-इस्रायल युद्धात अनेक दिवसांपासून केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने रविवारी उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील अणुकेंद्रावर रविवारी सकाळी ४.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटत असून रशिया, चीन, कतार, सौदी, पाकिस्तान आदी देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे. या कारवाईनंतर इराण संतापला असून या […]Read More
श्रीनगर, दि. २३ – पहलगामजवळील बैसरन खोर्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सरकारने बंद करण्यात आलेल्या ४८ पैकी १६ पर्यटनस्थळे पुन्हा खुली केली आहेत, त्यात पहलगामदेखील समाविष्ट आहे. याबाबत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम शहर पर्यटकांच्या वर्दळीने पुन्हा […]Read More