मुंबई,दि.२४ :– शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2025 वर्षात सात हजार मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील विकासकांनी 100 दिवसाला 690 मेगावॅटचा लक्ष्यांक केंद्र सरकारने दिलेला असताना 746 मेगावॅट सौर उर्जा निर्मिती केली. यामध्ये दिलेल्या मुदतीपेक्षा अगोदर लक्ष्यांक पूर्ण […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून निर्णयांचा सपाटा लावला जात आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबाबत विविध निर्णय घेतले जात असताना आता राज्याच्या उच्च शिक्षणातही मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट्स एक विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात सहज हस्तांतरित करता यावेत यासाठी […]Read More
डोंबिवली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली येथील रहिवासी अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले यांचा हकनाक बळी गेला. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. कुटुंबियांनी दहशतवाद्यांना अगदी जवळून पाहिले असल्याने तपासात मदत व्हावी यासाठी आता IB […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर आता देशभर पाकीस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारने पाकच्या नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या अबिर-गुलाल हा येत्या ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी (दि. २२) रोजी काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काल दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. काल सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनतर संध्याकाळी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर आज संध्याकाळी हल्ल्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित […]Read More
मुंबई दि. २४ :– सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून, मुख्यमंत्र्यांचे […]Read More
मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क):छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निर्दिष्ट स्थळावर विल्हेवाट लावावी, आवश्यक त्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ चा वापर करावा. पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह वाहता राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले आहेत. पावसाळापूर्व कामांचा […]Read More
चंद्रपूर दि २४:–चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान पुन्हा एकदा देशात अव्वल ठरले आहे. मंगळवारी शहर जिल्ह्यात 45.8 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. चंद्रपूर जिल्हा जंगलाचा आणि वाघांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील वन्यजीव शुश्रूषा केंद्रात विविध भागातून वेगवेगळ्या कारणांसाठी आणलेले आणि सध्या बंदिस्त असलेले बंदिस्त वाघ-बिबटे यांना उष्माघातापासून बचावासाठी वनविभाग सतर्कत बाळगत आहे. या सर्व पिंजऱ्याना ग्रीन नेट आणि […]Read More
मुंबई दि २४– राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ.प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय शासनाने आज निर्गमित केला. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातील अडचणी सोडविण्यासाठी मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकास कर्ज योजनेचं एक नवं मॉडेल समोर आणलं, बँकेने […]Read More
मुंबई दि२४– महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या 15 आणि 16 मार्च, 2025 रोजीच्या बारामती, जिल्हा पुणे दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटींसंदर्भात चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी पोलीसांना दोन हजार रुपये दंड बजावण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना चौकशी […]Read More