Month: April 2025

सांस्कृतिक

दोन महिन्यात राज्याचे नवे नाट्यगृहधोरण

वर्धा दि. १- महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना आणि प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबाबतीतील सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज केली. या धोरणाच्या आधारेच यापुढे […]Read More

Lifestyle

कोथिंबिरीची वडी – कुरकुरीत आणि पौष्टिक महाराष्ट्रीयन पदार्थ

मुंबई, दि. २४ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोथिंबिरीच्या वड्या हा महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि कुरकुरीत पदार्थ आहे, जो नाश्त्यासाठी किंवा जेवणासोबत साईड डिश म्हणून खाल्ला जातो. ही वडी फायबर आणि लोहाने समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठीही लाभदायक असते. चला, आज आपण कोथिंबिरीच्या वड्या बनवण्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहूया. साहित्य: कृती: १. वडीचे मिश्रण तयार करणे: २. वड्या […]Read More

देश विदेश

बुलडोझर कारवाई बाबत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले

नवी दिल्ली, दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई करण्यात येत असल्यामुळे योगी आदित्यनाथ यांचं सरकार चांगलंच चर्चेत आहे. अनेक गुन्हेगारांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. आता एका प्रकरणातील बुलडोझर कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला चांगलंच फटकारलं आहे. प्रयागराजमधील एक वकील, एक प्राध्यापक आणि इतर […]Read More

देश विदेश

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

इस्लामाबाद, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. राष्ट्रीय तिजोरीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहेत. जानेवारी २०२५ मध्ये पाकिस्तानच्या एका न्यायालयाने इम्रान खानला १४ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर राष्ट्रीय तिजोरीला ५० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप […]Read More

देश विदेश

सरकारकडून नैसर्गिक वायूच्या दरात ४ टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या मूल्य निर्धारण दरात (एपीएम) ४ टक्क्याने वाढ केली आहे. नैसर्गिक वायूपासून CNG व PNG तयार होत असल्याने त्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून सरकारने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवले आहेत. म्हणजेच सरकारने प्रति एमएमबीटीयू दरात ०.२५ टक्क्याने वाढ केली आहे. याबाबतची […]Read More

ट्रेण्डिंग

AI मुळे झोमॅटो करणार ६०० कर्मचाऱ्यांची कपात

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीची ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात प्रामुख्याने कंपनीच्या ग्राहक सेवा विभागात झाली असून, यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वाढता वापर आणि फूड डिलिव्हरी व्यवसायातील मंदी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे गुरुग्राम आणि हैदराबाद […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यात e-byke Taxi ला परवानगी

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य परिवहन विभागाकडून मांडण्यात आलेल्या ई-बाईक टॅक्सी सुरु करण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रात फक्त ई-बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी […]Read More

आरोग्य

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत २,५१७ रुग्णांना २२ कोटींची मदत

मुंबई, दि १ :– राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरजूंसाठी मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिले जाते. मार्च महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत तब्बल २५१७ रुग्णांना तब्बल २२ कोटींहून अधिकची मदत करण्यात आली असून सर्वाधिक मदत ही मेंदू विकारांवरील उपचारांसाठी करण्यात आली असल्याची माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. […]Read More

देश विदेश

वक्फ बोर्ड विधेयकासाठी भाजपचा व्हिप जारी

नवी दिल्ली, 1 : केंद्र सरकारकडून उद्या बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधित विधेयक सादर केले जाणार असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. पक्षाच्या खासदारांनी बुधवारी दिवसभर सभागृहात उपस्थित रहावे आणि सरकारच्या भूमिकेचे समर्थन करावे असे व्हीपमध्ये म्हटले आहे. वक्फ संशोधित विधेयक बुधवारी लोकसभेत मांडले जाणार असल्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला […]Read More