मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपातील रम्य आणि शांत ठिकाणांमध्ये स्लोव्हेनियामधील ब्लेड लेक (Lake Bled) हे नाव हमखास घेतलं जातं. जणू निळाशार काचेसारख्या पाण्यात तरंगत असलेलं एक सुंदर गाव – ब्लेड हे निसर्गप्रेमी, फोटोप्रेमी आणि शांततेचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी परिपूर्ण स्थान आहे. ब्लेड लेकचे वैशिष्ट्य: ब्लेड लेक हे ज्वालामुखीच्या क्रेटरमध्ये तयार झालेलं एक […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्सचे संतुलन टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते पीरियड्स, गरोदरपण, रजोनिवृत्ती आणि एकूण आरोग्यावर थेट परिणाम करते. अनियमित जीवनशैली, तणाव आणि अयोग्य आहारामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. अशा वेळी योग हा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपाय ठरतो. काही सोपी योगासने नियमित केल्यास हार्मोनल संतुलन साधता […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यांचा एकूण खर्च 18,658 कोटी रुपये (अंदाजे) आहे. महाराष्ट्र, ओदिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 15 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या या चार प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे सुमारे 1247 किलोमीटरने वाढेल. […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेत मंजूर झाल्यानंतर काल मध्यरात्रीनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुर झाले. या विधेयकाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला जात आहे. असे असतानाच आता काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद तसेच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैससी यांनी या विधेयकाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार (८७) आज पहाटे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. आज दुपारनंतर जुहू येथील विशाल टॉवरमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले आले आहे. उद्या सकाळी जुहू येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशभक्तिपर चित्रपटांच्या माध्यमातून मनोज कुमार यांनी प्रेक्षकांच्या […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय दिग्दर्शित ग्रामपंचायती भोवती फिरणारं लुटुपुटुचं राजकारण आणि गावातील साधे राहणीमान मांडणाऱ्या पंचायत या बेवसिरिजया मोठा चाहतावर्ग आहे. या सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या या सीरिजला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ‘प्राइम व्हिडीओ’ने ‘पंचायत 4’ ची […]Read More
मुंबई दि ४ : – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे […]Read More
नांदेड दि ४– नांदेड वसमत रोड वरील एका शेतशिवारामध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या – वसमत रोड वरील आलेगाव शिवारात आज सकाळी हा अपघात झाला. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील महिला […]Read More
ठाणे दि ४– हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर भिवंडीतील एका यंत्रमाग कामगाराच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातून 41 वा क्रमांक मिळवून न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे. लहानपणापासूनच संघर्ष हेच जणू त्याच्या आयुष्याचे सूत्र होते. घरची गरिबी, आई-वडिलांचे कष्टमय जीवन आणि शिक्षणाच्या वाटेतील अडथळे यांना न जुमानता त्यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. […]Read More
नवी दिल्ली, दि. 4 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा प्रलंबित निधी राज्याला लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी आज राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली. कृषी भवन येथे गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौहान यांची आज भेट घेतली. […]Read More