नवी दिल्ली, 10 : वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या फायद्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि विरोधकांच्या टीकेला तोंड देण्यासाठी भाजप 20 एप्रिलपासून पंधरवडाभर जनजागृती मोहीम सुरू करणार आहे. विशेषत: मुस्लिमांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी त्यांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. वक्फ कायद्यावरील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप मुस्लिम समुदायाच्या चिंता […]Read More
नाशिक, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चैत्री नवरात्री उत्सवानिमित्त देवीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. भाविकांची अलोट गर्दी झाल्याने गर्दीचे नियोजन ढासळले. त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे प्रशासन आणि पोलिस व्यवस्थेची मोठी तारांबळ उडाली. दर्शन सुलभ व्हावे म्हणून दर्शन मार्गात बॅरिकेड्स लावण्यात आले […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आणि खेळाडूंसाठी ही विशेष बातमी आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेटचा पुन्हा एकदा समावेश करण्यात येणार आहे. १२८ वर्षांनंतर क्रिकेट पुन्हा ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होणार आहे. क्रिकेट १९०० मध्ये ऑलिंपिकमध्ये शेवटचा खेळवण्यात आला होता.. २०२८ च्या ऑलिंपिकच्या आयोजकांनी हे सामने टी-२० स्वरूपात खेळवल्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय पक्षांचे पक्षांतर्गत देशव्यापी काम सातत्याने सुरु ठेवण्यासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता असते. यासाठी व्यक्ती आणि संस्थांकडून राजकीय पक्ष देणग्या स्वीकारतात. निवडणूक काळात किती खर्च करावा यावर बंधन असले तरीही त्या व्यतिरिक्त राजकीय पक्षांचा निधी किती असावा यावर कोणतीही मर्यादा नाही. गतवर्षी सत्ताधारी भाजपाला २,२४३ कोटी रुपयांची देणगी […]Read More
थिरुवनंतपुरम, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता केरळ सरकारने विशेष तरतूद केली आहे. आता केरळमध्ये मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांची (POCSO) एक विशेष पोलिस पथक चौकशी करेल. काल केरळ सरकारच्या मंत्रिमंडळाने यासाठी एक समर्पित शाखा तयार करण्यास मान्यता दिली. या विशेष युनिटमध्ये एकूण ३०४ नवीन पदे निर्माण […]Read More
फरार उद्योगपती विजय मल्ल्या याला मोठा धक्का बसला आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या एका संघाने मल्ल्याविरुद्ध यूकेमध्ये दिवाळखोरीचा आदेश कायम ठेवण्यासाठी न्यायालयीन खटला जिंकला. अशाप्रकारे, भारतीय बँकांना दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळाला आहे. किंगफिशर एअरलाइन्सवरील थकीत कर्जाची परतफेड करण्याची मागणी भारतीय बँका करत आहेत. यामुळे आता विजय मल्ल्याची ब्रिटनमधली मालमत्ता जप्त होणार आहे.Read More
एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली होती. नंतर मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला होता. आता एसटी महामंडळावर […]Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आय़ातशुल्क वाढीची घोषणा केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. शेअर बाजारांवरही याचा परिणाम दिसून आला. मात्र, आता ट्रम्प यांनी 75 हून अधिक देशांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांनी बहुचर्चित आयातशुल्क वाढीच्या धोरणावरून माघार घेत परस्पर आयात शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित केले आहे. मात्र, या सूटमध्ये चीनचा समावेश केलेला नाही. उलट चीनवरचे […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):फिलिपाइन्समध्ये वसलेलं बोराकाय हे बेट जगातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानलं जातं. पांढऱ्या मऊशार वाळूचे किनारे, निळसर पारदर्शक पाणी आणि सुंदर सूर्यास्त यामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या यादीत अग्रक्रमावर असतं. विशेषतः ‘व्हाइट बीच’ हा भाग जगप्रसिद्ध असून संध्याकाळी रंगीबेरंगी लायट्समधील नाईटलाइफ अनुभवण्यासाठी हे आदर्श ठिकाण आहे. बोराकाय बेटावर विविध जलक्रीडा प्रकारांचाही […]Read More
मुंबई दि.9(एम एमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी तसेच राष्ट्रीय सण उत्सवाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इमारतीवर विद्युत रोषणाई केली जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा एक राष्ट्रीय सणच आहे. या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुंबई […]Read More