Month: April 2025

ट्रेण्डिंग

सोने लवकरच गाठणार लाखांचा पल्ला…

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐन लग्नसराईत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्याच्या किमतीने वऱ्हाडी मंडळींना घाम फुटला आहे. सोने हळूहळू १ लाख रुपये तोळा हा दर गाठण्याच्या बेतात आहे. : देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचे भाव ९५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या होणारी प्रचंड खरेदी याला कारण ठरत आहेत. […]Read More

पर्यटन

पर्यटन महोत्सवासाठी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोल माफी

सातारा, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाबळेश्वर येथे येत्या २ ते ५ मे दरम्यान आयोजित महापर्यटन महोत्सवास येणाऱ्या पर्यटकांना वाटेतील प्रवेशकर व वाहनतळ आकारणीमध्ये माफी देण्यात आल्याची वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी महाबळेश्वर येथे माध्यमांशी बोलताना दिली. पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून व मंत्री, मदत व पुनर्वसन, मकरंद जाधव […]Read More

देश विदेश

टेरिफ वॉर अधिकच उग्र, ट्रम्प यांनी चीनवर लादला 245 %

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या टेरिफ वाढीने आता उग्र रुप धारण केले आहे. दोन्ही देश दिवसागणित परस्परांवर अधिकाधीक कर लावण्याची चढाओढ करत आहेत. अमेरिकेने आता चीनवर आणखी १००% कर लादला आहे. यासह, चिनी वस्तूंवरील एकूण शुल्क २४५% पर्यंत वाढले आहे. चीनने ११ एप्रिल रोजी अमेरिकन वस्तूंवर १२५% […]Read More

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयावर उपराष्ट्रपती नाराज, केली जाहीर टीका

नवी दि, १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “आपल्याला आता अधिक संवेदनशील व्हावे लागेल. राष्ट्रपतींना कालमर्यादा ठेवून निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. तसं न झाल्यास संबंधित विधेयकाचे कायद्यात रुपांतर होते. अनुच्छेद 142 हे न्यायव्यवस्थेसाठी न्यूक्लियर मिसाईल ठरत आहे. या अनुच्छेदाचा वापर लोकशाही प्रक्रियेला पाठ दाखवण्यासाठी केला जात आहे,” अशा परखड शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च […]Read More

सांस्कृतिक

पंढरपूर ते लंडन आंतरराष्ट्रीय दिंडीचे नागपुरात स्वागत…

नागपूर दि १७– पंढरपूर वरून लंडन साठी निघालेली दिंडी नागपूरात दाखल झाल्यानंतर नागपुरातील विष्णुजी की रसोई बजाजनगर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पंढरपूरहून पांडुरंगाच्या पादुका घेऊन ही दिंडी देहू, आळंदी, पुणे, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करीत काल नागपूरात दाखल झाली. सर्व ठिकाणी पालखींचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. पादुकांच्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंगच अवतरीत झाल्याचा भास […]Read More

राजकीय

पहिलीपासून हिंदीची सक्ती, राज ठाकरे यांचा विरोध….

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. सरकारचे सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी […]Read More

मनोरंजन

चित्रपती व्ही.शांताराम आणि स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा

मुंबई, दि १७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा […]Read More

ट्रेण्डिंग

शेगांव तालुक्यात केसांनंतर आता नखांची गळती, रूग्णांमध्ये वाढ

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरण काही महिन्यांपूर्वी उजेडात आले होते. केस गळतीनंतर नवीनच समस्येला गावकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाली आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आयसीएमआर रिपोर्ट दाबून ठेऊन रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा […]Read More

महाराष्ट्र

कारागृहांमध्ये कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास मिळणार भरपाई

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सरकारने राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर कैद्यांच्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या नवीन धोरणानुसार, कारागृह […]Read More

कोकण

रानटी हत्तींचा उपद्रव वाढला, शेतकरी चिंताग्रस्त

सिंधुदुर्ग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसात रानटी हत्तींचा उपद्रव वाढत चालला आहे. तिलारी खोरे परिसरातील मोरले , केर आदी गावांमध्ये सध्या पाच रानटी हत्ती फिरताना दिसत आहेत. यामध्ये दोन नर, एक मादी आणि दोन पिल्ले यांचा समावेश आहे. हे हत्ती वाडी वस्तीतून फिरताना शेती आणि बागायतीचे मोठ्या प्रमाणात […]Read More