Month: March 2025

कोकण

दाभोळ खाडीपात्रात रात्रीच्या वेळेस संशयास्पद बोटींचा वावर…

रत्नागिरी, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दाभोळ खाडीपात्रातील केतकी आणि करंबवणे गावांमध्ये रात्रीच्या वेळेस संशयास्पद बोटींचा वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये संशयाचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या अंधारात अनेक बोटी मोठ्या प्रमाणात खाडीत घिरट्या घालत आहेत. अचानक अवजड बोटी मोठ्या प्रमाणात दिसल्यामुळे खाडी किनारपट्टी सुरक्षा प्रश्न निर्माण होत आहे. फिरत असलेल्या बोटी मच्छिमारांच्या नसल्याचा निर्वाळा स्थानिकांकडून दिला जात […]Read More

कोकण

कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात…

रत्नागिरी, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात शिमगोत्सवाला सुरवात झाली आहे. गुहागर तालुक्यातील गिमवी गावात झोलाई देवीचा शिमगोत्सव दरवर्षी मोठया उत्साहात साजरा होतो. यानिमित्ताने ग्रामदेवता झोलाई देवी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि जत्रेत सहभागी होतात. गावच्या मंदिरात लाठ फिरवण्याची प्रथा आहे. या लाठेवर मानकरी विराजमान होतात. ML/ML/PGB 9 […]Read More

पर्यावरण

जैवविविधता संवर्धन – निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक पावले

मुंबई, दि. ९ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचा समावेश असलेली एक नैसर्गिक संपत्ती आहे. यात वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि त्यांच्या पर्यावरणाशी असलेले संबंध यांचा समावेश होतो. मात्र, मानवी हस्तक्षेप, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामान बदलामुळे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली आहे. जैवविविधतेचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. जैवविविधता कमी होण्याची […]Read More

देश विदेश

महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीतील ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथ ‘विंदांचे गद्यरूप’ यासाठी तर गुजराती भाषेसाठी दिलीप झवेरी यांना त्यांच्या ‘भगवाननी वातो’ या कवितासंग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राजधानीतील कमानी ऑडिटोरियममध्ये ‘ साहित्य अकादमी पुरस्कार 2024 अर्पण’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात […]Read More

देश विदेश

देश चालवण्यासाठी नेपाळ सरकार घेत आहे नागरिकांकडून कर्ज

काठमांडू, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वित्तीय मदत थांबवल्यामुळे नेपाळची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. सरकारला विद्यमान खर्च पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे सरकारला देशातील लोकांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. सार्वजनिक कर्जाचा भार वेगाने वाढत आहे आणि आता तो दुप्पट झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ७ महिन्यांत सार्वजनिक […]Read More

बिझनेस

या बँकांकडूनच ई-फायलिंग पोर्टलवर होणार कर भरणा

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मार्च महिना उजाडला की कर भरण्यासाठी उशीर झालेल्यांची धावपळ सुरु होते. आयकर विभागाने करदात्यांची सुविधा वाढवण्यासाठी ई-पे टॅक्स सेवेअंतर्गत बँकांची यादी ई-फायलिंग पोर्टलवर अपडेट केली आहे. आता या सुविधेसाठी ३० बँका उपलब्ध आहेत. यामध्ये नव्याने सामील झालेल्या बँका आणि स्थलांतरित बँकांचा समावेश आहे. हा बदल करदात्यांना अधिक पर्याय […]Read More

महानगर

सागरी किनारा मार्गाच्या विस्तारासाठी ३०० वृक्षांवर चालणार कुऱ्हाड

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सागर किनारी मार्ग उपयुक्त ठरणार आहे. मात्र आता या सागरी मार्गाच्या विस्तारामुळे ३०० हून अधिक वृक्ष नष्ट होणार आहेत. सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीमधील स्थानिकांनी लावलेल्या ३०० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने […]Read More

पर्यावरण

गोदा पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नाशिक मनपाची विशेष मोहीम

नाशिक, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाने गोदावरी नदीपात्राच्या स्वच्छतेची जोरदार मोहिम हाती घेतली आहे. गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वनस्पतींमुळे पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवा थर तयार झाला आहे. गोदावरी नदीपात्रात अल्पावधीतच फोफावलेली पानवेली काढण्यासाठी आता नाशिक महापालिका कोटय़वधी रुपये खर्च करणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या […]Read More

ट्रेण्डिंग

ED ने जप्त केले व्यावसायिक जेट

हैदराबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात अनेक ठिकाणी सक्तवसुली संचालनालायाकडून (ED) छापे टाकण्याचे प्रकार नेहमीच समोर येत असताता. आजच्या एका कारवाईत ED ने चक्क व्यावसायिक जेट जप्त केले आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज एक व्यावसायिक जेट जप्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी हैदराबादच्या फाल्कन ग्रुप आणि त्यांच्या प्रवर्तकांविरुद्ध […]Read More