मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून या महामार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांमुळे होणाऱ्या विलंबामुळे उशिराने करायच्या जन्म मृत्यू नोंदीसाठी सरकारने नवीन तरतूद केली असून, त्यानुसार एक वर्षाहून अधिक काळ विलंब झाला आहे त्यांची नोंदणी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांना याबाबत नोंद करून संबंधित दाखले देण्याची ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे. यामुळे […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात कृत्रिम चीज आणि पनीर तयार करून त्याची विक्री केली जात असून त्यामुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भामध्ये शासन तातडीने गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना विक्रम पाचपुते […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसने सर्वोच्च सन्मानाने गौरवले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ या देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत. पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा 21 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशाचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज बुधवारी (दि १२) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी , पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबाबत जागरुक करण्याच्या तसेच विद्यार्थ्यांना नवीन संधी देण्याच्या उद्देशाने, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आंतरवासीयता उपक्रम तसेच प्रकल्प प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन अभ्यासक्रमाच्या देशभरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमांचा लाभ घेता येणार आहे.या क्षेत्रातील संधींसोबतच यासाठी आवश्यक शिक्षणापासूनही […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघ (WFI) वरील बंदी उठवली आहे.त्यामुळे देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि तदर्थ समिती प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत होते. २१ डिसेंबर २०२३ रोजी WFI चे अध्यक्ष झाल्यानंतर, संजय सिंह यांनी […]Read More
मुंबई, दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : HCL ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्राला हस्तांतरित केला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’ नुसार, रोशनी आता ३.१३ लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत भारतीय बनल्या आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडे आहे. रोशनीपूर्वी […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात आता इंटरनेट सेवाही आयात होणार आहे.भारती एअरटेलने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंक आणण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्ससोबत करार केला आहे. अर्थात यामुळे देशाच्या दुर्गम भागात इंटरनेट सेवा पोहोचण्यास मदत होईल. आज स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये एअरटेलने ही माहिती दिली. स्टारलिंक लो-अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये उपग्रहांचे जागतिक नेटवर्क […]Read More
मुंबई दि ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील महसूल प्रशासन गतिमान करण्यासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यातील ८० अधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसांचा निर्णय धडाक्यातील हा महत्वपूर्ण निर्णय असून, गेली आठ नऊ वर्षं […]Read More