Month: March 2025

विदर्भ

विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा अतिउष्ण तापमान इशारा…

चंद्रपूर दि १४ :–हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिला आहे. अकोला -यवतमाळ- चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी आगामी 24 तासाचा अतिउष्ण तापमान इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसात चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाने मोठी उसळी घेतली आहे. होळी नंतर तापमानात झालेली मोठी वाढ नागरिकांसाठी चिंताजनक ठरली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात […]Read More

राजकीय

एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवड

मुंबई, दि. १४:– राज्यातील महायुती सरकार विकासकामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करीत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅारिशस सरकारच्यावतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्यामुळे […]Read More

सांस्कृतिक

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला…

रत्नागिरी दि १४:– कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. सडामिर्‍या आणि जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्यांची भेट झाली. रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली. वर्षातून एक वेळ होणारी भेट पाहण्यासाठी भाविक आतुर असतात. ढोल […]Read More

कोकण

होळीनिमित्ताने समुद्रात कोळ्यांच्या सुशोभित होड्यांनी वेधलं लक्ष…

अलिबाग दि १४ — आपल्या मच्छीमारी व्यवसायात चांगली बरकत मिळावी आणि दुष्काळ नाहीसा व्हावा अशी मनोभावे प्रार्थना करीत रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी होळी साजरी केली. होळीचा उत्सव हा कोळी समुदायासाठी एक मोठा सण. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातल्या कोळी बांधवांनी काल आपल्या होड्या पताका लावून तर काहींनी फुलांच्या माळा लावून सजवल्या होत्या. प्रत्येक होडीवर गाण्यांच्या तालावर कोळी बांधवांनी […]Read More

महानगर

ठाण्यात रंगणार श्रमिक कलावंतांचा कला महोत्सव

ठाणे दि १४– महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलांचा कला महोत्सव ठाण्यात रंगणार आहे. बाळासाहेब ठाकरे कलादालन, रविवार १६ मार्च आणि सोमवार १७ मार्च दरम्यान श्रमिक कलावंतांच्या कलांनी थिरकणार असून कचरा वेचक, सफाई सेविका, घरकाम करणाऱ्या महिलांसह तृतीयपंथी, तमाशा कलावंत, गोंधळी, संबळ वादक, अंध दिव्यांग, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा कलावंत असे जवळपास १०० हून अधिक श्रमिक […]Read More

खान्देश

रेल्वे रुळांवर आलेल्या ट्रकला एक्सप्रेसची धडक

जळगाव दि १४ — जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर आज अमरावती एक्स्प्रेसची ट्रकला धडक बसल्याने मोठा अपघात झाला मात्र त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. बंद असलेल्या रेल्वे गेट मधून धान्याने भरलेला ट्रक मध्येच आल्याने हा भीषण अपघात झाला. रेल्वे गेट पास करत असताना अचानक ट्रक बंद पडल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.रेल्वे ट्रॅकवर […]Read More

ट्रेण्डिंग

कारगिलमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंप, जम्मू-काश्मीर, लडाखमध्येही हादरे

देशाच्या काही भागांमध्ये शुक्रवारी पहाटे भूकंपाचे हादरे बसले आहेत. लडाखच्या कारगिलमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. रात्री 2.50 मिनिटांपासून हे धक्के जाणवले. कारगिलसोबतच संपूर्ण लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.Read More

मनोरंजन

आमिर खानला मिळाली नवी पार्टनर, साठाव्या वाढदिवसाला दिली पुन्हा प्रेमात

आमिर खानचा आज १४ मार्च रोजी ६० वा वाढदिवस आहे. काल १३ मार्चला त्याने पत्रकारांबरोबर प्री बर्थडे सेलिब्रेशन केले. यावेळी त्याने मिडियासमोर त्याच्या नव्या पार्टनरची ओळख करून दिली. आमिरच्या या मैत्रीणीचं नाव आहे गौरी स्प्रेट. गौरी ही तमिळ व आयरिश आहे. त्यांची २५ वर्षांपासूनची मैत्री आहे. पण, गेल्या दीड वर्षांपासून ते डेट करत आहेत. गौरी […]Read More

राजकीय

अजित पवारांच्या घरी वाजणार सनई-चौघडे, जय पवार लवकरच लग्नबंधनात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा 10 एप्रिलला साखरपुडा होणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न होणार आहे. साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा यांनी मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. दोघांनी शरद पवारांना […]Read More

ट्रेण्डिंग

धुलीवंदनानिमित्त दगडुशेठ गणपीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज १४ मार्चला द्राक्ष महोत्सव करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.Read More