Month: March 2025

पर्यावरण

दहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

नवी दिल्ली, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभरापासून देशभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याने आज जम्मू-काश्मीर, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानसह ९ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला आहे. तर१० राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार […]Read More

देश विदेश

अर्थमंत्र्यांच्या हस्ते होणार पंतप्रधान इंटर्नशिप स्कीमचे (PMIS) ॲप लॉन्च

नवी दिल्ली, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि.१७) पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) ॲप लॉन्च करणार आहेत. या ॲपमुळे तरुणांना इंटर्नशिपसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे. यासोबतच त्या कोलकातामध्ये पहिले सुविधा केंद्र सुरू करणार आहे. हे केंद्र कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांनी तयार केले […]Read More

बिझनेस

अदानी समूहाला मिळाले ३६ हजार कोटींच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावी पुनर्विकासाचे मोठे काम सुरू असतानाच आता अदानी समूहाने मुंबईतील एका मोठ्या प्रकल्पाची बोली जिंकली आहे. हा प्रकल्प ३६ हजार कोटी रुपयांचा आहे. हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण विकास प्रकल्पांपैकी एक असून तो अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड द्वारे पूर्ण केला जाईल. अदानी ग्रुपची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड […]Read More

राजकीय

या राज्यात सरकारी निविदांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४% आरक्षण

बंगळुरू, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कर्नाटकचे काँग्रेस सरकार सरकारी निविदांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के आरक्षण देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक पारदर्शकता सार्वजनिक खरेदी कायद्यात (केटीपीपी) बदल प्रस्तावित केले, ज्याला मंजुरी देण्यात आली आहे.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक खरेदीमध्ये पारदर्शकता (केटीपीपी) कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेच्या या अर्थसंकल्पीय […]Read More

पर्यटन

मल्डोव्हा – युरोपातील लपलेले सौंदर्यस्थळ

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे जसे की फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड आपण ऐकलेच असतील, पण मल्डोव्हा (Moldova) हे एक अनोखे आणि कमी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे, जे प्रवाशांसाठी खूप खास अनुभव देऊ शकते. इतिहास, संस्कृती, अप्रतिम वाइन आणि निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या देशाला ‘युरोपचे गुपित रत्न’ असेही म्हटले जाते. मल्डोव्हा का […]Read More

देश विदेश

मतदार ओळखपत्र आधारही लिंक करण्याची तयारी

नवी दिल्ली, 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मतदार यादीतील गैरप्रकारांचे आरोप होत असतानाच मतदार ओळखपत्रे आधारशी जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा केली. नुकतेच संसदेत डुप्लिकेट मतदार ओळखपत्राच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाच्या […]Read More

देश विदेश

रोहिणी आयोगाचा अहवाल लोकसभेत सादर करण्याची मागणी

नवी दिल्ली, 15 : देशातील बहुसंख्यांक इतर मागासवर्गीय (ओबीसी) बांधवांना विशेषत: या प्रवर्गातील शोषित, पीडित, वंचित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने न्या.रोहिणी आयोग स्थापन केला होता. सरकारने लोकसभेत हा अहवाल सादर करावा, अशी मागणी ओबीसी नेते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केली.पत्रकारांसोबत बोलताना पाटील म्हणाले […]Read More

सांस्कृतिक

शिमगोत्सवात मढं यात्रा काढण्याची अनोखी परंपरा…

रत्नागिरी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील शिमगोत्सव इथे जोपासल्या जाणाऱ्या प्रथा आणि परंपरांमुळे विशेष ठरतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मढ यात्रा काढण्याची अनोखी परंपरा आहे. संपूर्ण कोकणात अशा प्रकारची ही प्रथा फक्त खेड तालुक्यातच जोपासली जाते. गावाला नजर लागू नये आणि येणारे वितुष्ट दूर व्हावे यासाठी ही मढ यात्रा काढली जाते. पूर्वजांपासून ही परंपरा […]Read More

ऍग्रो

वाशीम जिल्हात उन्हाळी मुगाचे क्षेत्र वाढले

वाशीम दि १५:– वाशीम जिल्ह्यात यंदा उन्हाळी मुगाचं क्षेत्र वाढलं असून सरासरीपेक्षा २९७ हेक्टर वर जास्त पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिलीये. वाशीम जिल्ह्यात सरासरी १हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मुगाची पेरणी अपेक्षित होती. मात्र यामध्ये वाढ झाली असून यावर्षी १ हजार ६१२ हेक्टर वर उन्हाळी मुगाची पेरणी झालीये. मूग हे कमी कालावधी चांगलं उत्पन्न […]Read More

ऍग्रो

हळदीचे दर घसरल्याने शेतकरी वर्ग अडचणीत

सांगली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. गेली दोन वर्षे वायदा बाजारामुळे हळदीचे दर सुमारे 4000 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला हळदीचे दर वाढवले जातात. नंतर चार ते पाच हजार रुपयांनी हळदीचे दर पाडले जातात. यावर कुणाचेच नियंत्रण नाही. हळद […]Read More