Month: March 2025

विज्ञान

उद्या पहाटे साडेतीन वाजता अंतराळातून पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स, बुच

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. ९ महिन्यानंतर हे दोघे पृथ्वीवर परतणार आहेत. नासा आणि इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचे यान ड्रॅगनमधून हे आंतराळवीर परतणार आहेत. स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग झाले असून पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सुनिता विल्यम्स 19 मार्चला पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी […]Read More

क्रीडा

गुजरात टायटन्सचे मालक बदलले, टोरंट ग्रुपचीही सहमालकी

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 वा हंगाम येत्या चार दिवसात म्हणजेच 22 मार्च पासून सुरू होणार आहे. या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन घेण्यात आले. त्यामुळे प्रत्येक संघातच मोठे बदल झाले आहे. महत्वाचं म्हणजे गुजरात टायटन्सचे मालकच बदलले आहेत. टोरंट ग्रुपने गुजरात टायटन्सचे 67 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. या करारासाठी बीसीसीआयकडून मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आयपीएल 2025 […]Read More

महानगर

उपसभापतींवरील अविश्वास प्रस्ताव विधानपरिषदेत फेटाळला

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला. विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडण्याची सूचना सभापतींना दिली होती मात्र हा प्रस्ताव स्वीकारण्याच्या विहित निकषांची पूर्तता झालेली नाही आणि पदावरून दूर करण्यासाठी ठोस कारण यात दिलेलं नाही असं सभापती राम […]Read More

राजकीय

२३ मार्चपासून ४८ तासांचा देशव्यापी बँक संप !

मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क): देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून २५ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत ४८ तास संप पुकारण्याची घोषणा केली आहे. या संपामध्ये देशभरातील ८ लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती यू.एफ.बी.इ.यू.चे निमंत्रक देविदास तुळजापुरकर […]Read More

राजकीय

दिल्ली विधानसभेचा मॉडेल म्हणून विकास करा – बिर्ला यांचे आवाहन

नवी दिल्ली, 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विधानसभा देशासमोर आदर्श निर्माण करू शकेल, असे नवनिर्वाचित आमदारांनी काम करावे. तसेच दिल्ली विधानसभेला ‘मॉडेल’ विधानसभा म्हणून विकसित करण्याचे आव्हान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी केले.नवनिर्वाचित आमदारांसाठी आयोजित दोन दिवसीय ओरिएंटशन कार्यक्रमाचे उद्घाटन बिर्ला यांनी केले. बिर्ला म्हणाले की,आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांनी स्वतःला सुधारण्यास वाव […]Read More

महानगर

नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कटाचा भाग, सरकारचा दावा

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूरमध्ये झालेली घटना ही समाजकंटकांनी पूर्वनियोजित कट करून केलेला हल्ला आहे असं सांगत कोणालाही सोडणार नाही , दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल , पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचा रोखठोक हिशेब होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री आणि सभागृहनेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत याबाबत निवेदन देताना दिली. […]Read More

विदर्भ

कालच्या उद्रेकानंतर नागपूरात तणावपूर्ण शांतता

नागपूर दि १८– नागपूरातील महाल परीसरात काल सायंकाळी दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकी नंतर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. रात्री 2 वाजेपर्यंत महाल परीसरात प्रचंड तणाव होता. विविध प्रकारच्या अफवानंतर महाल परिसरातील तणावावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे .समाजकंटकांच्या हल्ल्यात 15 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले. या स्थितीतदेखील पोलिसांनी कायदा […]Read More

राजकीय

काँग्रेस प्रदेसाध्यक्षांच्या वक्तव्यावर गदारोळ

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रूर औरंगजेबाशी तुलना करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. विधानपरिषदेत सत्ताधारी सदस्यांनी हौद्यात उतरून सपकाळ यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. आज कामकाज सुरू होताच भाजपा […]Read More

महानगर

मुंबईत दर शनिवारी मिळणार तिरुपती बालाजीचे पवित्र लाडू प्रसाद

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील तिरुपती बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दर शनिवारी सायन येथील तिरुपती बालाजी मंदिरात आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध “श्रीवरी लाडू प्रसादम” उपलब्ध होणार आहे. इंडिया पोस्टच्या पॅन इंडिया नेटवर्कमुळे हे शक्य झाले आहे. मुंबई सायन सर्कल येथील ६७ जयंत हाऊस, युनायटेड जैन स्टुडंट होम रोड या ठिकाणी हे लाडू उपलब्ध […]Read More

शिक्षण

शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्य सरकारने शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ४९५ डी.एड. आणि बी.एड. शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. प्रखर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे.संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन मोहिते म्हणाले, “२३ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय पुनर्जीवित करून आम्हाला […]Read More